तानाजीनंतर ‘आदिपुरूष’सह बॉक्स ऑफिसवर गाजवायला मराठमोळा ओम राऊत पुन्हा एकदा सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2023 17:49 IST2023-05-22T17:46:14+5:302023-05-22T17:49:18+5:30
आदिपुरुष या चित्रपटात प्रभास हा रामाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर अभिनेत्री कृती सेनन सीता ही भूमिका साकारणार आहे.

तानाजीनंतर ‘आदिपुरूष’सह बॉक्स ऑफिसवर गाजवायला मराठमोळा ओम राऊत पुन्हा एकदा सज्ज
दिग्दर्शक ओम राऊत यांचा आगामी ‘आदिपुरूष’ (Adipurush) सिनेमा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट पुढील महिन्यात १६ जून रोजी प्रदर्शित होत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर देखील रिलीज झाला. त्यानंतर अनेकांनी या ट्रेलरचं कौतुक केलं आहे.त्यानंतर अलीकडेच रिलीज झालेले या चित्रपटातील जय श्री राम हे गाणं देखील प्रेक्षकांच्या पसंती उतरलं.
ओम राऊत दिग्दर्शित या चित्रपटातील VFXचं देखील लोक कौतुक करतायेत. ओम राऊत यांनी अजय देवगनची मुख्य भूमिका असलेला 'तानाजी' सिनेमाचं ही दिग्दर्शन केलं होतं जो बॉक्स ऑफिसवर सुपरडुपर हिट ठरला होता. यानंतर ते पुन्हा पुन्हा एकदा आदिपुरुषसह बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालायला सज्ज झाले आहेत. आदिपुरुषच्या ट्रेलर रिलीज झाल्यानंतर केवळ २४ तासांत ७० मिलियन व्ह्यूज मिळाले होते. आता या सिनेमाच्या रिलीजची वाट प्रेक्षक मोठ्या आतुरतेने पाहत आहेत.
'आदिपुरुष' हा चित्रपट 16 जून रोजी रिलीज होणार आहे. आदिपुरुष या चित्रपटात प्रभास हा रामाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर अभिनेत्री कृती सेनन सीता ही भूमिका साकारणार आहे. तसेच या चित्रपटात सनी सिंह हा लक्ष्मण ही भूमिका साकारत आहे. 'आदिपुरुष' या चित्रपटात मराठमोळा देवदत्त नागे (Devdatta Nage) हा हनुमानाची भूमिका साकारत आहे.