ओम पुरी यांनी मागितली माफी; आता हवी ‘ही’ शिक्षा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2016 13:21 IST2016-10-05T07:51:03+5:302016-10-05T13:21:03+5:30

भारतीय जवानांविरूद्ध केलेले वक्तव्य अंगलट येण्याची चिन्हे दिसताच ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांनी माफी मागितली आहे. मी जे काही ...

Om Puri asks for forgiveness; Now 'only' education! | ओम पुरी यांनी मागितली माफी; आता हवी ‘ही’ शिक्षा!

ओम पुरी यांनी मागितली माफी; आता हवी ‘ही’ शिक्षा!

रतीय जवानांविरूद्ध केलेले वक्तव्य अंगलट येण्याची चिन्हे दिसताच ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांनी माफी मागितली आहे. मी जे काही बोललो, त्याबद्दल दिलगीर आहे. मला यासाठी शिक्षा मिळायला हवी. मी सर्वात आधी उरी हल्ल्यात शहीद झालेल्या कुटुंबीयांची माफी मागू इच्छितो. त्यांनी मला माफ केल्यास मी संपूर्ण देशाची आणि लष्कराची माफी मागेल. आधी बोलून जायचे आणि मग माफी मागायची, हे योग्य नाही. मला हे ठाऊक आहे. मी गुन्हेगार आहे. मला शिक्षा मिळायला हवी. या गुन्ह्यासाठी माझे कोर्ट मार्शल व्हायला हवे. मला एक रचनात्मक शिक्षा हवी. लष्कराने शस्त्रास्त्र कसे चालवात, हे मला शिकवावे आणि लढण्यासाठी सीमेवर पाठवावे. मला शिक्षा द्यावी. मी ती भोगायला तयार आहे, अशा शब्दांत ओम पुरी यांनी क्षमायाचना केली आहे.
 उरी दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. याच पार्श्वभुमीवर चित्रपट निमार्ता संघटनेने पाकिस्तानी अभिनेत्यांवर बंदी घातली आहे. याच विषयावर एका वृत्तावाहिनीवरील चर्चेदरम्यान पाकिस्तानी कलाकार व्हिसा घेऊन भारतात येतात, असे सांगत पाकी कलाकारांची बाजू घेतली होती. तुम्ही पाकिस्तानी कलाकारांची बाजू का घेतायं? असा उलट सवाल यानंतर त्यांना करण्यात आला होता. यावर मात्र ओमपुरी चांगलेच संतापले होते. जवानांना सैन्यात जायला आम्ही सांगितलं होतं का ? त्यांना शस्त्र उचलण्यास कोणी सांगितलं ? असे प्रतिप्रश्न ओम पुरी यांनी केले होते. इतकेच नाही तर   तर 15 ते 20 लोकांचं आत्मघाती पथक तयार करा आणि पाकिस्तानला पाठवून स्फोट घडवून आणा असेही ते म्हणाले होते.

Web Title: Om Puri asks for forgiveness; Now 'only' education!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.