जुन्या जोड्यांचा नवा तडका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2017 18:54 IST2017-07-11T13:24:50+5:302017-07-11T18:54:50+5:30

अबोली कुलकर्णी  सध्या फ्रेश आणि हटके जोड्यांचा जमाना असला तरी देखील जुन्या जोड्यांच्या अभिनयाचा तडका काही औरच असतो. आता ...

Old couple's new tadka! | जुन्या जोड्यांचा नवा तडका!

जुन्या जोड्यांचा नवा तडका!

ong>अबोली कुलकर्णी 
सध्या फ्रेश आणि हटके जोड्यांचा जमाना असला तरी देखील जुन्या जोड्यांच्या अभिनयाचा तडका काही औरच असतो. आता हेच बघा ना, सध्या चर्चेत असलेली जोडी म्हणजे ऐश्वर्या रॉय बच्चन आणि अनिल कपूर. हे दोघे तब्बल १७ वर्षांनंतर ‘फन्ने खान’ या आगामी चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. ‘हमारा दिल आपके पास हैं’,‘ताल’ या चित्रपटांमध्ये या दोघांनी एकत्र काम केले होते. अशा अनेक जोड्या आहेत ज्या त्यांच्या हिट जोडीदारांसोबत कित्येक वर्षांनंतर परतल्या आहेत. पाहूयात, कोणत्या आहेत या जोड्या...

                            

अजय देवगन-तब्बू 
‘तक्षक’ आणि ‘विजयपथ’ या चित्रपटात अजय देवगन आणि तब्बू हे दोघे महत्त्वाच्या भूमिकेत दिसले आहेत. त्यांच्या या जोडीवर प्रेक्षकांनी खूप प्रेम केलं. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘दृश्यम’ चित्रपटात हे दोघं जवळपास १६ वर्षांनंतर  एकत्र आले. त्यांनी मिळून अनेक हिट चित्रपट दिले. तब्बू तर अजयला तिचं ‘ट्रम्प कार्ड’ समजते. 

                          

शाहरूख खान-काजोल
 नव्वदीच्या दशकातील रोमँटिक कपल म्हणजे शाहरूख खान आणि काजोल. ‘बाजीगर’,‘दिलवाले दुल्हनियाँ ले जायेंगे’,‘करण अर्जुन’,‘कुछ कुछ होता हैं’, ‘कभी खुशी कभी गम’ यासारख्या चित्रपटांनी बॉक्स आॅफिसवर खुप गल्ला जमवला. हीच जोडी २०१० मध्ये ‘माय नेम इज खान’ चित्रपटात दिसली होती. त्यानंतर ती थेट २०१६ मध्येच दिसली. एवढ्या मोठ्या ब्रेकनंतरही त्यांच्यातील केमिस्ट्री ही पडद्यावर जादू करणारी होती.

                               

सैफ अली खान-प्रिती झिंटा
‘द डिम्पल क्वीन’ प्रिती झिंटा आणि सैफ अली खान यांनी एकत्र अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांच्या जोडीवर प्रेक्षकांनी खूप प्रेम केले. २००५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सलाम नमस्ते’ या चित्रपटात त्यांनी एकत्र काम केले असून तब्बल २०१४ मध्ये ‘हॅप्पी एंडिंग’ चित्रपटात ते दोघे एकत्र दिसले. 

                            

नसिरुद्दीन शाह-पंकज कपूर
बॉलिवूडचे दोन उत्कृष्ट कलाकार म्हणजे नसिरूद्दीन शाह आणि पंकज कपूर. यांनी ‘मंडी’,‘ खामोश’, ‘जीने भी दो यारों’, ‘जलवा’,‘मोहन जोशी हाजिर हो’ अशा अनेक चित्रपटात काम केलं आहे. या दोघांनी विशाल भारद्वाज यांच्या चित्रपटात काम केलं आहे. मात्र, या दोघांमध्ये एकही सीन एकत्र शूट केलेला नाही. त्यांनी २००३ मध्ये रिलीज झालेल्या ‘मकबूल’ या चित्रपटात काम केले होते. मात्र त्यानंतर ते थेट २०१४  मध्ये ‘फार्इंडिंग फॅनी’ चित्रपटांत एकत्र दिसून आले. 

                          

डिंपल कपाडिया- विनोद खन्ना 
‘इंसाफ’ (१९८७), ‘आखरी अदालत’ (१९८८), बटवारा( १९८९) आणि खून का कर्ज( १९९१) अशा अनेक चित्रपटांमध्ये डिंपल कपाडिया आणि विनोद खन्ना यांनी एकत्र काम केले होते. मात्र, त्यानंतर ते २००२ मध्ये रिलीज झालेल्या ‘लीला’ या चित्रपटात एकत्र आले. या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर काही गल्ला जमवला नाही. पण, मग ते दोघे सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हा यांच्या २०१० मध्ये रिलीज झालेल्या ‘दबंग’ चित्रपटात दिसून आले. 

Web Title: Old couple's new tadka!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.