Ohhh: नोटाबंदीची झळ 'या' अभिनेत्रींनाही, कार्यक्रमात परफॉर्म करण्यासाठी कमी चार्जेसमध्येही होतात रेडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2017 17:36 IST2017-01-23T12:06:33+5:302017-01-23T17:36:33+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000च्या जुन्या नोटा चलनातून बाद करत नव्या नोटा चलनात आणल्या.नोटाबंदीचा हा फटका सामान्यांपर्यंत ...

Ohhh: These 'actresses' also face redundancy, they are also available at low cost to perform in the program | Ohhh: नोटाबंदीची झळ 'या' अभिनेत्रींनाही, कार्यक्रमात परफॉर्म करण्यासाठी कमी चार्जेसमध्येही होतात रेडी

Ohhh: नोटाबंदीची झळ 'या' अभिनेत्रींनाही, कार्यक्रमात परफॉर्म करण्यासाठी कमी चार्जेसमध्येही होतात रेडी

तप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000च्या जुन्या नोटा चलनातून बाद करत नव्या नोटा चलनात आणल्या.नोटाबंदीचा हा फटका सामान्यांपर्यंत सेलिब्रेटींनाही पडल्याचे दिसतेय. होय, करोडो रूपयांची फीस घेणारे या अभिनेत्रींनी चक्क नोटांबदीमुळे आपले चार्जेस कमी करावे लागले आहेत. होय,अनेक अभिनेत्री काही तासांच्या परफॉर्मन्ससाठी ५० लाख ते १ कोटी रूपये फीस घ्यायचे. पण आता  नोटाबंदीने हे चार्जेस कमी झाले आहेत. कोण कोणत्या अभिनेत्रीना बसलीय नोटाबंदीची झळ जाणून घेवूयात.

बिपाशा बासू




नोटबंदी लागू होण्यापूर्वी बिपाशा बासू आपल्या परफॉर्मन्ससाठी 5 करोड फीस घ्यायची.करोडोंवर असणा-या बिपाशा बासूचा हा आकडा आता १५ ते २० लाख रूपयेपर्यंत पोहचला आहे.कार्यक्रमात  परफॉर्म करण्यासाठी  ती आता २२ लाख रूपये घेते. त्यासोबत नॉर्मल परफॉर्मन्ससाठी ती २५ लाख रूपये चार्ज करते. नोटाबंदीआधी हा आकडा करोडोंच्या घरात होता.   

एली अवराम



अभिनेत्री एली अवराम ही सुद्धा मोठी लोकप्रिय अभिनेत्री असून तिचेही रेड कार्डवरील रेट खाली आले आहेत. ती एका नॉर्मल इव्हेंटसाठी आता ३ ते ५ लाख रूपये चार्ज करते. लग्न समारंभासाठी ती १५ लाख रूपये चार्ज करते. तेच एखाद्या नॉर्मल परफॉर्मन्ससाठी ती ६ ते ७ लाख रूपये चार्ज करते.

गौहर खान



एका कार्यक्रमात परफॉर्म करण्यासाठी गौहर खान नोटाबंदीनंतर तिनेही तिचे चार्जेस कमी केले आहेत. आता गौहर एका नॉर्मल इव्हेंट्साटी ६ लाख रूपये चार्ज करत आहे. लग्न समारंभासाठी ती १५ लाख रूपये आणि नॉर्मल परफॉर्मन्ससाठी ती १२ लाख रूपये चार्ज करत आहे.

Web Title: Ohhh: These 'actresses' also face redundancy, they are also available at low cost to perform in the program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.