अरे वाह...! प्रेग्नेंट ईशा देओलने मुलगी राध्यासोबत केला डान्स, पहा तिचे Photos
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 19:00 IST2019-04-01T19:00:00+5:302019-04-01T19:00:00+5:30
ईशा देओलने इंस्टाग्रामवर फोटो शेअर केला असून ज्यात ती मुलगी राध्यासोबत डान्स करताना दिसते आहे.

अरे वाह...! प्रेग्नेंट ईशा देओलने मुलगी राध्यासोबत केला डान्स, पहा तिचे Photos
अभिनेत्री ईशा देओल दुसऱ्यांदा आई बनणार आहे. तिची मुलगी राध्या एका वर्षांची होणार आहे. ईशा देओल मातृत्व खूप एन्जॉय करते आहे. ईशा देओलने इंस्टाग्रामवर फोटो शेअर केला असून ज्यात ती मुलगी राध्यासोबत डान्स करताना दिसते आहे. ईशाला आई हेमा मालिनीसारखे डान्स परफॉर्म करण्यासाठी ओळखले जाते. ईशाने बऱ्याच चित्रपटात काम केले. मात्र आई हेमा मालिनी व वडील धर्मेंद्र यांच्यासारखी यशस्वी होऊ शकली नाही. आता लग्नानंतर ईशा फॅमिली लाईफ एन्जॉय करते आहे.
सध्या ईशा आपल्या कुटंबात मग्न आहे. आपण ज्या व्हिडिओबद्दल बोलतो आहे, त्यात ईशा मुलगी राध्याला कडेवर घेऊन धडक चित्रपटातील झिंगाट गाण्यावर डान्स करताना दिसते आहे. या फोटोत आई व मुलगी यांची बॉण्डिंग पाहायला मिळते. वार्षिक स्नेहसंमेलनात ईशाची मुलगी राध्या तख्तानी व ईशाने डान्स परफॉर्म करून उपस्थितांची मने जिंकली.
इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत ईशाने लिहिले की, राध्याचे तिच्या मॉमीसोबत पहिल्यांदाच केला स्टेजवर डान्स परफॉर्म. ईशा व राध्याने महाराष्ट्रीयन गेटअप केले होते. त्या दोघी हिरवी व लाल रंगाच्या नववारी साडी परिधान केली आहे.
याबद्दल ईशा देओल म्हणाली की, जेव्हापासून राधाचा जन्म झाला. तेव्हापासून ती म्युझिक वाजू लागली की थिरकायला लागते. जेव्हा तिने वार्षिक स्नेहसंमेलनात परफॉर्म केले. हा क्षण माझ्यासाठी व नवरा भरत तख्तानीसाठी खास होता. मला सर्व काही परफेक्ट हवे होते. त्यामुळे मी डान्सनुसार कॉश्चुमही मॅच केला होता.
ईशा देओलने ओडिशा डान्सचे प्रशिक्षण घेतले आहे. सांस्कृतिक नृत्य करून ईशा नेहमीच आई हेमा मालिनींचा वारसा जतन करते आहे.
ईशाला विचारले की, राध्यादेखील ओडिशा डान्स शिकणार का? त्यावर ईशा म्हणाली की, आता कोणताही डान्स फॉर्म शिकण्यासाठी राध्या खूप छोटी आहे. आता तिने बालपण एन्जॉय करावे अशी माझी इच्छा आहे. तिला हवा तो कलाप्रकार शिकू शकते. आमचा नेहमीच तिला पाठिंबा आहे.