OMG 3: अक्षय कुमारच्या 'ओह माय गॉड'चा तिसरा भाग येणार, 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीची होणार एन्ट्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 16:37 IST2026-01-02T16:36:16+5:302026-01-02T16:37:09+5:30
अभिनेत्रीच्या एन्ट्रीने चाहते आतुर झाले आहेत.

OMG 3: अक्षय कुमारच्या 'ओह माय गॉड'चा तिसरा भाग येणार, 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीची होणार एन्ट्री
अक्षय कुमारच्या 'ओह माय गॉड' सिनेमाचे आतापर्यंत दोन भाग आले. दोन्ही भाग प्रचंड गाजले. पहिल्या भागात परेश रावल यांच्या अभिनयाने धमाल आली होती. तर दुसऱ्या भागात पंकज त्रिपाठींनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. आता 'ओह माय गॉड ३'ची चर्चा आहे. याचवर्षी सिनेमाचं शूट सुरु होणार आहे. या सिनेमात कोण दिसणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
'ओह माय गॉड'ची फ्रँचायझी सुपरहिट आहे. हटके कथानक, अक्षय कुमारचा देवाच्या रुपातील अवतार यामुळे सिनेमा प्रेक्षकांना भावतो. आता तिसऱ्या पार्टसाठीही प्रेक्षक उत्सुक आहेत. 'पिंकव्हिला' रिपोर्टनुसार तिसऱ्या भागात राणी मुखर्जीची एन्ट्री होणार आहे. याचा अर्थ सिनेमात काहीतरी वेगळं बघायला मिळणार हे नक्की आहे. सध्या सिनेमा प्री प्रोडक्शन स्टेजवर आहे. यावर्षीच्या मध्यापर्यंत सिनेमाचं शूट सुरु होण्याची शक्यता आहे. दिग्दर्शक अमिर रायला अशी कथा मिळाली आहे जी पहिल्या दोन भागांपेक्षा आणखी हार्ड हिटिंग असणार आहे. राणी मुखर्जीला सिनेमात पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
'ओह माय गॉड' २०१२ साली आला होता. नंतर ११ वर्षांनी २०२३ साली 'ओह माय गॉड २' आला. दोन्ही सिनेमांना आयएमडीबीने ७ आणि ८ रेटिंग दिले. तर आता तीन वर्षात तिसऱ्या भागाची तयारी सुरु झाली आहे.