​अरे देवा, सिक्कीमवर हे काय बोलून गेली प्रियांका चोप्रा? वाचा सविस्तर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2017 12:45 IST2017-09-14T07:15:53+5:302017-09-14T12:45:53+5:30

प्रियांका चोप्रा म्हणायला हॉलिवूडमध्ये बिझी आहे. पण सध्या ती हॉलिवूडपेक्षा भारतातच अधिक चर्चेत आहे. होय, एका वादग्रस्त विधानामुळे प्रियांका ...

Oh God, what did Priyanka Chopra say on Sikkim? Read detailed! | ​अरे देवा, सिक्कीमवर हे काय बोलून गेली प्रियांका चोप्रा? वाचा सविस्तर!

​अरे देवा, सिक्कीमवर हे काय बोलून गेली प्रियांका चोप्रा? वाचा सविस्तर!

रियांका चोप्रा म्हणायला हॉलिवूडमध्ये बिझी आहे. पण सध्या ती हॉलिवूडपेक्षा भारतातच अधिक चर्चेत आहे. होय, एका वादग्रस्त विधानामुळे प्रियांका चर्चेत आली आहे. केवळ चर्चेत नाही तर या वादग्रस्त विधानामुळे तिने लोकांचा संताप ओढवून घेतला आहे.
हा मामला नेमका काय आहे, तर तेच आम्ही तुम्हाला सांगतोय. अलीकडे प्रियांका टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये सहभागी झाली. याठिकाणी प्रियांकाने प्रोड्यूस केलेल्या ‘पहुना’ या चित्रपटाचे स्क्रीनिंग झाले. या फेस्टिवलमध्ये प्रियांकाच्या ‘पहुना’ची चांगलीच प्रशंसा झाली. चित्रपटाला स्टँडिंग ओविएशन मिळाले. या कौतुकानंतर प्रियांकाची मुलाखत घेतली गेली. या मुलाखतीत मात्र प्रियांका भलतेच काही बोलून गेली अन् तिने लोकांची नाराजी ओढवून घेतली. सिक्कीम हे भारताच्या ईशान्य भागातील एक लहानसे राज्य आहे. येथे कधीच चित्रपटसृष्टी पोहोचली नाही. या राज्यातील कुणीही कधीही चित्रपट बनवलेला नाही. ‘पहुना’ हा या राज्याशी संबंधित चित्रपट आहे. कारण सिक्कीम हे दहशतवादाने पोळलेले राज्य आहे, असे प्रियांका म्हणाली. मग काय तिच्या या विधानानंतर सोशल साईटवर लोकांनी प्रियांकाला चांगलेच घेरले.

ALSO READ : संन्यास वगैरे सगळे खोटे! मार्च 2018 मध्ये प्रियांका चोप्रा साईन करणार दोन बॉलिवूड सिनेमे!!

 लोकांनी तिच्या या विधानाची तीव्र शब्दांत निंदा केली. ‘मी प्रियांकाच्या या बोलण्याची निंदा करतो. सिक्कीम भारताचे सर्वाधिक शांतीप्रिय राज्य आहे. तुला लाज वाटायला हवी’, असे एका युजरने लिहिले. अनेक युजर्सनी प्रियांकाच्या तोकड्या माहितीवर बोट ठेवले. ‘प्रियांका, स्वत:च्या माहितीत भर घाल अन् सिक्कीमच्या लोकांची माफी माग,’असे एकाने लिहिले. अन्य एका युजर्सने प्रियांकाला थेटपणे सिक्कीम कुठे आहे, हे तरी तुला ठाऊक आहे का? असा उपरोधिक प्रश्न विचारून टाकला. ‘सिक्कीम एक शांतीप्रिय राज्य आहे आणि कायम शांतीपूर्ण राहिले आहे. सिक्कीम कुठे आहे, हे तरी प्रियांकाला ठाऊक आहे का?,’ असे या युजरने लिहिले.
आता प्रियांका यावर काय उत्तर देते, ते बघूच. खरे तर सिक्कीम आजही आपल्या प्रारंभिक अवस्थेत आहे. पण राज्यात आधीही चित्रपट बनले आहेत, हे मात्र खरे. प्रियांकाला हे ठाऊक असायलाच हवे. तुम्हाला काय वाटते?

Web Title: Oh God, what did Priyanka Chopra say on Sikkim? Read detailed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.