अरेच्चा...! जिममध्ये दीपिका पादुकोणनं गाळला भरपूर घाम, तरीदेखील पूर्ण करू शकली नाही टास्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2019 16:50 IST2019-05-14T16:49:50+5:302019-05-14T16:50:18+5:30

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या न्यूयॉर्कमध्ये आहे आणि कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी जय्यत तयारी करते आहे.

Oh ...! Deepika Padukone did not get enough sweat in the gym, but she could not even complete the task | अरेच्चा...! जिममध्ये दीपिका पादुकोणनं गाळला भरपूर घाम, तरीदेखील पूर्ण करू शकली नाही टास्क

अरेच्चा...! जिममध्ये दीपिका पादुकोणनं गाळला भरपूर घाम, तरीदेखील पूर्ण करू शकली नाही टास्क

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या न्यूयॉर्कमध्ये आहे आणि कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी जय्यत तयारी करते आहे. नुकतेच तिने जिममधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.


बॉलिवूडमधील सर्वच कलाकार स्वतःला फिट व यंग ठेवण्यासाठी जिममध्ये जी-तोड मेहनत करतात. कतरिना कैफपासून आलिया भट व दीपिका पादुकोण यांच्यासारख्या बऱ्याच अभिनेत्री आहेत ज्या खूप वर्कआऊट करतात आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करतात. नुकतेच दीपिकाने सोशल मीडियावर जिममधील फोटो शेअर केले आहेत.


दीपिकाने इंस्टाग्रामवर वर्कआऊटचे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पाहून तिच्या चाहत्यांनी पुशअप मारण्यात अयशस्वी ठरली आहे पण प्रयत्न केला पाहिजे. या फोटोत दीपिका खूप थकलेली दिसते आहे. पण ती खूशही दिसते. 


दीपिकादेखील ऐश्वर्या राय बच्चन, सोनम कपूर यांच्यासारखी लॉरियल अँम्बेसिडर असल्यामुळे कान्समध्ये सहभागी होण्यासाठी पोहचली आहे. दीपिका यंदा तिसऱ्यांदा कान्स महोत्सवात रेड कार्पेटवर जलवा दाखवताना दिसणार आहे. 


या दरम्यान दीपिका न्यूयॉर्कमध्ये आपल्या आजारावर उपचार करत असलेले ऋषी कपूर व त्यांची पत्नी नीतू कपूर यांनादेखील भेटली. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला.

नीतू व ऋषी कपूर यांनी दीपिकाला एक छानसे ब्रेसलेटदेखील भेट म्हणून दिले. हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.

Web Title: Oh ...! Deepika Padukone did not get enough sweat in the gym, but she could not even complete the task