​ ‘बाहुबली2’चे ‘हे’ मोशन पोस्टर पाहून तुम्हीही पडाल प्रभासच्या प्रेमात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2017 13:44 IST2017-02-24T08:14:27+5:302017-02-24T13:44:27+5:30

एस.एस. राजमौली यांच्या चित्रपटाच्या प्रत्येक पोस्टरसह ही आतुरता वाढत चालली आहे. ‘बाहुबली2’चे नवे मोशन पोस्टर पाहाल तर तुमची उत्सुकता आणखीच वाढणार आहे.

'O' motion picture poster of 'Bahubali2' you will also love Padhal Prabhas! | ​ ‘बाहुबली2’चे ‘हे’ मोशन पोस्टर पाहून तुम्हीही पडाल प्रभासच्या प्रेमात!

​ ‘बाहुबली2’चे ‘हे’ मोशन पोस्टर पाहून तुम्हीही पडाल प्रभासच्या प्रेमात!

टप्पाने बाहुबली क्यों मारा’ याचे उत्तर आपल्याला लवकरच मिळणार आहे. त्यामुळे आमच्यासारखे आपणही ‘बाहुबली2’ पाहण्यास आतुर असाल, हे आलेच. खरे तर एस.एस. राजमौली यांच्या चित्रपटाच्या प्रत्येक पोस्टरसह ही आतुरता वाढत चालली आहे. ‘बाहुबली2’चे नवे मोशन पोस्टर पाहाल तर तुमची उत्सुकता आणखीच वाढणार आहे. ‘बाहुबली’मध्ये खांद्यावर विशाल शिवलिंग उचललेला अभिनेता प्रभास तुम्ही पाहिला होता. ‘बाहुबली2’मध्ये प्रभासचे आणखी एक वेगळे रूप तुम्ही पाहणार आहात.
आज महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर राजमौली यांनी टिष्ट्वटर आणि फेसबुकवर ‘बाहुबली दी कनक्ल्युजन’चे हे नवे पोस्टर जारी केले आहे.  यानंतर सोशल मीडियावर सर्वत्र हे पोस्टर शेअर केले गेले. उण्यापुºया दोन-तीन तासांत ६२ हजारांपेक्षा अधिक लोकांनी या पोस्टरला लाईक केले. फेसबुकवर केवळ अर्ध्या तासात २२ हजारांवर लोकांनी या पोस्टरवर आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या . या पोस्टरमध्ये अभिनेता प्रभास एका सोनेरी हत्तीच्या सोंडेवरून त्याच्या माथ्यावर चढतांना दिसतोय. सोशल मीडियावरचा हा उत्स्फूर्त प्रतिसाद बघता, लोक हा चित्रपट बघण्यास किती उत्सूक आहेत, हेच कळते.



२०१५ मध्ये आलेल्या ‘बाहुबली’ने धुमाकूळ घालत बॉक्स आॅफिसवर रेकॉर्डब्रेक  १०० कोटीहून अधिकची कमाई केली होती.  ‘बाहुबली: दी बिगीनिंग’मध्ये मुख्य भूमिका साकारणारा  प्रभास असो वा खलनायकाची भूमिका साकारणारा राणा डग्गुबती, या सगळ्यांनीच अपार लोकप्रीयता मिळवली. खांद्यावर विशाल शिवलिंग उचललेला अभिनेता प्रभास पाहून तर चित्रपटरसिक थक्क झाले होते.  कटप्पाने बाहुबली को क्यूं मारा? या प्रश्नाचे उत्तर प्रेक्षकांना ‘बाहुबली2’मध्ये मध्यतरानंतर अर्थात क्लायमॅक्समध्ये मिळणार आहे.  या क्लायमॅक्स सीनवर तब्बल 30 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची चर्चा आहे. . 
‘बाहुबली2’च्या चित्रीकरणाला गतवर्षी डिसेंबरमध्ये सुरुवात झाली. त्यानंतर प्रभासने चार महिने इथेच विशेष प्रशिक्षण घेतले. प्रत्येक दृश्यायासाठी त्याने कठोर परिश्रम घेतले. त्याची ही मेहनत किती फळास आली, ते लवकरच दिसणार आहे. 

Web Title: 'O' motion picture poster of 'Bahubali2' you will also love Padhal Prabhas!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.