न्यू इअरची पार्टी करण्यासाठी काजोलची लेक पोहोचली दुबईत, फोटो दिसणार 'तो' मुलगा कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2022 13:04 IST2022-12-31T12:56:45+5:302022-12-31T13:04:46+5:30
न्यू इअर सेलिब्रेट करण्यासाठी काजोल आणि अजय देवगणची लेक न्यासा दुबईला गेली आहे.

न्यू इअरची पार्टी करण्यासाठी काजोलची लेक पोहोचली दुबईत, फोटो दिसणार 'तो' मुलगा कोण?
अजय देवगण (Ajay Devgan) व काजोलची (Kajol) लेक न्यासा देवगण (Nysa Devgan) या ना त्या कारणानं सतत चर्चेत असते. अद्याप न्यासाचा बॉलिवूड डेब्यू झालेला नाही. पण सेलिब्रिटी किड असल्यामुळे कॅमेरे सतत तिच्यावर असतात. सध्या ती दुबईत आहे. नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करण्यासाठी ती तिच्या मैत्रिणींसोबत दुबईत गेली आहे. तिथलं काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. या फोटोंमध्ये तिच्यासोबत ओरहान आणि मॉडेल तानिया श्रॉफसुद्धा दिसते आहे.
न्यासा (Nysa Devgan)ने शेअर केलेल्या पहिल्या फोटोमध्ये तिच्या एका हातात पासपोर्ट आणि दुसऱ्या हातात ड्रिंक घेऊन पोझ देताना दिसतेय. ओरहानसोबत ती मुंबईहून दुबईला रवाना झाली. त्यानंतर ओरहानने न्यासा देवगनच्या शेजारी बसलेले त्याचे स्टायलिश फोटो पोस्ट केले. यात तानिया श्रॉफ देखील आहे, जी सध्या सुनील शेट्टीचा मुलगा आणि अभिनेता अहान शेट्टीला डेट करत आहे.
ओरहान हा एक मुंबई बेस्ड सोशल एक्टिव्हिस्ट आहे. त्याने सारासोबत कोलंबिया युनिव्हर्सिटीतून आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्याला प्रोफेशनल ऍनिमेटर व्हायचं आहे. सारा अली खान, जान्हवी कपूर, खुशी कपूरसोबत पार्टी करतानाचे ओरहानचे सर्व फोटो समोर आले आहेत. त्याचे बॉलिवूड सेलेब्रेटीजच नव्हे तर हॉलिवूड सेलिब्रेटीसुद्धा खास मित्र आहेत. त्याचे किम कर्दाशियन आणि तिच्या बहिणीसोबत चांगले संबंध आहेत.
न्यासाबाबत बोलायाचे झाले काजोल व अजयची लेक न्यासा स्वित्झर्लंडमध्ये उच्च शिक्षण घेत आहे. न्यासाचा बॉलिवूड डेब्यू कधी होणार? हे जाणून घेण्यास चाहते उत्सुक आहेत. मात्र सध्या न्यासा शिकतेय. आत्ता ती तिचं लाईफ एन्जॉय करतेय. ती इतक्या लवकर इंडस्ट्रीत येईल, असं मला वाटत नाही, असं काजोल अलीकडे एका मुलाखतीत म्हणाली होती.