​नूतनची नात प्रनूतन बॉलिवूड डेब्यूसाठी सज्ज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2017 13:45 IST2017-03-13T08:15:59+5:302017-03-13T13:45:59+5:30

बॉलिवूड अभिनेत्री नूतन आजही सिनेप्रेमींच्या मनात जिवंत आहे. आपल्या करिअरमध्ये नूतनने एकापेक्षा एक सिनेमे दिलेत. नूतन काळाच्या पडद्याआड गेली, ...

Nutan's dancing is ready for an original Bollywood debut! | ​नूतनची नात प्रनूतन बॉलिवूड डेब्यूसाठी सज्ज!

​नूतनची नात प्रनूतन बॉलिवूड डेब्यूसाठी सज्ज!

लिवूड अभिनेत्री नूतन आजही सिनेप्रेमींच्या मनात जिवंत आहे. आपल्या करिअरमध्ये नूतनने एकापेक्षा एक सिनेमे दिलेत. नूतन काळाच्या पडद्याआड गेली, त्याला आत्ता उणीपुरी २५ वर्षे झाली आहेत. पण सध्या नूतन पुन्हा चर्चेत आली आहे. होय, कारण आहे, तिची नात. नूतनची नात प्रनूतन सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. प्रनूतन म्हणजे, नूतनची नात आणि अभिनेता मोहनिश बहन याची लाडकी मुलगी.



प्रनूतनचे काही  फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. प्रनूतन लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार असल्याची चर्चा आहे. असे झालेच तर प्रनूतन ही श्रीदेवीची ग्लॅमरस मुलगी जान्हवी कपूर आणि सैफ अली खानची मुलगी सारा अली खान या दोघींसाठी मोठे आव्हान ठरेल, हे नक्की.



प्रनूतनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत आणि तिची तुलना झाली ती थेट आजी नूतन हिच्यासोबत. प्रनूतनचे शिक्षण पूर्ण झाले आहे. गतवर्षी प्रनूतनने कॉमर्समध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केले आणि आता ती बॉलिवूडमध्ये येण्यास उत्सूक आहे. तिने तिची ही इच्छा बोलून दाखवली आहे, मला लहानपणापासून अभिनेत्रीच बनायचे होते. आता मी चित्रपटांत येण्यास उत्सूक आहे. राहिली गोष्ट आॅफरची तर मी शिक्षण घेत होते, तेव्हापासून मला अनेक चित्रपटांच्या आॅफर्स मिळत आहेत, असे प्रनूतन म्हणाली.  



अर्थात प्रनूतनचे डॅडी अर्थात मोहनीश बहल याला त्याच्या मुलीचे ग्रॅण्ड लॉन्चिंग व्हावे, असे वाटतेय. कुटुंबाचा वारसा पुढे जाईल, असे चित्रपट प्रनूतनने निवडावेत, असे त्याला वाटतेयं. मोहनीश व त्याचे कुटुंब कायम प्रकाशझोतापासून दूर राहिले आहे. त्यामुळे त्याच्या कुटुंबाबाबत फारशी माहिती नाही. 



Web Title: Nutan's dancing is ready for an original Bollywood debut!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.