नुसरत भरूचाचा आगामी थरारपट 'छोरी'चा टीझर झाला रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2021 15:28 IST2021-11-09T15:28:25+5:302021-11-09T15:28:47+5:30

नुसरत भरुचाची मुख्य भूमिका असलेल्या छोरी चित्रपटाची गोष्ट निर्जन गावात घडणाऱ्या अमानवी घटनांवर आधारीत आहे

Nusrat Bharuch's upcoming thriller 'Chhori' teaser released | नुसरत भरूचाचा आगामी थरारपट 'छोरी'चा टीझर झाला रिलीज

नुसरत भरूचाचा आगामी थरारपट 'छोरी'चा टीझर झाला रिलीज

प्राईम व्हिडिओजने छोरी या आपल्या आगामी थरारपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित करत प्रेक्षकांना अनोखी पर्वणी दिली आणि आज परत ‘छोरी’च्या विश्वाची झलक दाखवणाऱ्या टीझरचे अनावरण करण्यात आले. या टीझरमध्ये साक्षीचा (नुसरत भरूचा) शहरातून निर्जन बेटाकडे होणारा प्रवास दाखवण्यात आला आहे, ज्या दरम्यान तिला अमानवी घटनांचा अनुभव येतो. हा सिनेमा २६ नोव्हेंबर रोजी प्राइम व्हिडिओजवर प्रदर्शित होणार असून २४० देश- प्रदेशांसह जगभरात पाहाता येईल.

टीझरमध्ये हादरवून टाकणारा थरार अनुभवायला मिळतो आणि त्यातूनच पुढे काय होणार याची कल्पना येते. गावात घडणाऱ्या नाट्यमय प्रसंगामागचे रहस्य ती अनुभवते आणि त्यामुळे छोरी पाहण्याची उत्सुकता आणखी वाढली आहे.

विशाल फुरिया दिग्दर्शित आणि भूषण कुमार, कृष्णन कुमार, विक्रम मल्होत्रा, जॅक डेव्हिस आणि शिखा शर्मा यांची निर्मिती असलेला छोरी हा लपाछपी या मराठी सिनेमाचा रिमेक असून त्यात नुसरत भरूचा प्रमुख भूमिकेत आहे. त्याशिवाय मीता वशिष्ठ, राजेश जैस, सौरभ गोयल आणि यानिया भारद्वाज यांच्याही भूमिका आहेत. थरार, उत्कंठा यांचे अनोखे मिश्रण असलेला, खिळवून ठेवणारा हा सिनेमा आहे.

Web Title: Nusrat Bharuch's upcoming thriller 'Chhori' teaser released