सेटवर अचानक ढसाढसा रडू लागली नुसरत भरुचा, हॉरर सिनेमाचे करत होती शूटिंग
By गीतांजली | Updated: December 18, 2020 18:30 IST2020-12-18T18:30:00+5:302020-12-18T18:30:07+5:30
नुसरत भरुचा सध्या तिच्या आगामी 'छोIरी' या हॉरर सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

सेटवर अचानक ढसाढसा रडू लागली नुसरत भरुचा, हॉरर सिनेमाचे करत होती शूटिंग
अभिनेत्री नुसरत भरुचा सध्या तिच्या आगामी 'छोIरी' या हॉरर सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. नुसरत या चित्रपटाद्वारे एका नवा जॉनरमध्ये प्रवेश करतेय. हा चित्रपट 2017 साली रिलीज झालेल्या सुपरहिट मराठी चित्रपट 'लपाछुपी'चा हिंदी रिमेक आहे. या सिनेमात नुसरत प्रेग्नेंट महिलेची भूमिका साकारणार आहे.
अलीकडेच या सिनेमाच्या शूटिंगच्या सेटवर असे काहीतरी घडले की नुसरत भरुचा रडायला लागली. नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार नुसरत एक इमोशनल सीन शूट करत होती. हा सीन करत असताना नुसरत इतकी भावनिक झाली की, दिग्दर्शकाने कट म्हटल्यानंतर ही ती रडत राहिली. नुसरतला पाहून चित्रपटाच्या दिग्दर्शक सुद्धा काळजी वाटू लागली आणि तो तिला संभाळण्यासाठी नुसरतकडे धावला.
नुसरत म्हणाली की, कामाचा थकवा आहे की माझे इमोशन्स होते हे तिला माहित नाही पण तिचं रडणे काही केल्या थांबत नव्हते. नुसरतने या चित्रपटासाठी खूप तयारी केली आहे. काही दिवसांपूर्वी तिने एका मुलाखतीत सांगितले होते की, 'छोरी' ची तयारी करण्यासाठी त्याने वेगवेगळ्या भाषांतील हॉरर चित्रपट पाहिले आहेत.
हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत स्वत: नुसरतने नावात बदल केल्याची माहिती दिली. शिवाय यामागचे कारणही सांगितले. तिने सांगितले, माझा नशिबावर विश्वास आहे. ज्योतिष शास्त्र, अंकशास्त्र, टॅरो कार्ड सगळ्यांवर माझी प्रगाढ श्रद्धा आहे. ब्रह्मांड आणि याची ऊर्जा यावरही माझा विश्वास आहे. अलीकडे मी एका अंकशास्त्र विषयात तज्ज्ञ असलेल्या एका व्यक्तीस भेटले. त्यांनी मला माझ्या नावाच्या स्पेलिंगमध्ये बदल केल्यास होणा-या लाभांबद्दल सांगितले. त्यांच्या सल्ल्यानुसार तिने आपल्या नावात काही बदल केला आहे. या नव्या स्पेलिंगमुळे माझे करिअर आणखी उंचीवर जाईल असा मला पूर्ण विश्वास आहे.