​नन झालेली सोफिया हयात Officially Engaged!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2017 17:06 IST2017-03-02T10:09:04+5:302017-03-02T17:06:14+5:30

अभिनेत्रीची नन बनणारी आणि रोज नवे वाद ओढवून घेणारी ‘बिग बॉस’ची एक्स कंटेस्टेंट सोफिया हयात पुन्हा चर्चेत आहे. होय, सोफियाला आयुष्यभराची सोबत करणारा जोडीदार मिळाला आहे. केवळ एवढेच नाही तर तिने या जोडीदारासोबत साखरपुडाही उरकला आहे. मदर सोफियाने स्वत: तिच्या साखरपुड्याची बातमी सोशल मीडियावर जाहिर केली. अर्थात तिने तिच्या पार्टनरबाबत काहीही सांगितले नाही.

Nunty Sophia Hayat Officially Engaged! | ​नन झालेली सोफिया हयात Officially Engaged!

​नन झालेली सोफिया हयात Officially Engaged!

िनेत्रीची नन बनणारी आणि रोज नवे वाद ओढवून घेणारी ‘बिग बॉस’ची एक्स कंटेस्टेंट सोफिया हयात पुन्हा चर्चेत आहे. थांबा...थांबा... कुठल्याशा वादामुळे नाही तर सोशल मीडियावर केलेल्या एका घोषणेमुळे. होय, सोफियाला आयुष्यभराची सोबत करणारा जोडीदार मिळाला आहे. केवळ एवढेच नाही तर तिने या जोडीदारासोबत साखरपुडाही उरकला आहे. मदर सोफियाने स्वत: तिच्या साखरपुड्याची बातमी सोशल मीडियावर जाहिर केली. अर्थात तिने तिच्या पार्टनरबाबत काहीही सांगितले नाही.
 


सोफियाने डिनरचा एक फोटो सुद्धा शेअर केला. यात ती तिच्या भावी जोडीदाराचा हात पकडून आहे. जेव्हा असा कुणी मिळतो, तेव्हा तो सर्वाधिक आनंद देऊन जातो. आता मी आॅफिशिअली एंगेज्ड आहे, असे सोफियाने जाहिर केले आहे. एक आठवडा डेटिंग केल्यानंतर आम्ही एकमेकांना चांगले ओळखतो. आम्हाला ठाऊक होते की, प्रेमाला काहीही सीमा नाही. इतक्या कमी वेळात तुम्हाला अमर्यादीत प्रेमाची जाणीव झाली असती तर तुम्ही समजू शकला असता. या लग्नाची प्रतीक्षा स्वर्गालाही आहे. कॉस्मिक मातेला फायनली कॉस्मिक पिता मिळाला. जग आमचे अनकंडीशनल प्रेम पाहून थक्क होईल, असेही सोफियाने लिहिले आहे.
नन बनल्यानंतर सोफिया काही दिवस पांढºया कपड्यांमध्ये दिसली. पण अलीकडे ती पुन्हा एकदा तिच्या पूर्वीच्या बोल्ड अवतारात वावरू लागली आहे. सोशल मीडियावरचे तिचे फोटो याचा पुरावा आहे.

अलीकडे सोफियाने  तळव्यांवर  टॅटूचा गोंदवून त्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. तिच्या या फोटोवर लोकांनी चांगल्याच संतप्त प्रतिक्रिया नोंदवल्या होत्या.   स्वस्तिक या चिन्हाचे हिंदू धर्मात धार्मिक महत्त्व आहे. त्यामुळे सोफियाच्या या टॅटवर सुमारे दोनशेवर लोकांनी कमेंट देत तिच्या या कृत्याची निंदा केली होती. काही लोकांनी सोफियाला देशाबाहेर हाकलून देण्याची तर  काहींनी तिला कायदेशीर नोटीस पाठविण्याची धमकी दिली होती.

Web Title: Nunty Sophia Hayat Officially Engaged!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.