आता पाहता येणार नाही राहाची झलक, सैफ अली खान प्रकरणानंतर आलिया-रणबीरनं घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 17:00 IST2025-03-14T16:59:41+5:302025-03-14T17:00:38+5:30

Alia Bhatt-Ranbir Kapoor : सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर आलिया भट आणि रणबीर कपूर यांनी त्यांची मुलगी राहा कपूरसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

Now we won't be able to see Raha's glimpse, Alia Bhatt-Ranbir Kapoor took a big decision after the Saif Ali Khan affair | आता पाहता येणार नाही राहाची झलक, सैफ अली खान प्रकरणानंतर आलिया-रणबीरनं घेतला मोठा निर्णय

आता पाहता येणार नाही राहाची झलक, सैफ अली खान प्रकरणानंतर आलिया-रणबीरनं घेतला मोठा निर्णय

१६ जानेवारी रोजी रात्री सैफ अली खान(Saif Ali Khan)वर एका हल्लेखोराने त्याच्या घरात घुसून चाकूने हल्ला केला होता. हल्लेखोराने अभिनेत्याचा मुलगा तैमूर अली खान याला लक्ष्य केल्याचे सांगण्यात आले होते. मात्र सैफ अली खानमुळे तो वाचला. मात्र या अपघातामुळे बॉलिवूड सेलिब्रिटींना कठोर पावले उचलावी लागली आहेत. अलिकडेच आलिया भट(Alia Bhatt)ने मुलगी राहा कपूरचे सर्व फोटो इंस्टाग्रामवरून हटवले होते. पण आता तिच्या वाढदिवसाआधी मीडियाशी संवाद साधत अभिनेत्री आणि तिचा पती रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांनी आपल्या मुलीचे फोटो न काढण्याची विनंती केली आहे.

रणबीर कपूर आणि आलिया भट यांनी मीडियाला कॉल करून अभिनेत्रीच्या प्री-बर्थडे सेलिब्रेशनमध्ये राहाचे फोटो क्लिक करू नयेत अशी विनंती केली आणि जर कोणी कुटुंबाचा फोटो पोस्ट केला असेल तर कृपया त्यांना पोस्ट न करण्यास सांगितले. आलिया भट म्हणाली, सैफच्या घटनेनंतर मला माझ्या मुलीबद्दल भीती आणि असुरक्षित वाटत आहे, आता आम्ही आमच्या नवीन घरात शिफ्ट होणार आहोत, त्यामुळे तुम्हाला विनंती आहे की, घरासमोर उभे राहून फोटो काढू नका. राहा एका विशिष्ट वयापर्यंत मोठी झाल्यावर तिचे फोटो क्लिक करायचे की नाही हे आम्ही ठरवू. तसेच, तिचा फोटो दिसावा किंवा लोकांनी त्यावर कमेंट करावी असे मला वाटत नाही.

काय आहे सैफ हल्ला प्रकरण?
अभिनेता सैफ अली खानने या घटनेबद्दल सांगितले की तो आणि त्याची पत्नी करीना कपूर खान सदगुरु शरण बिल्डिंगच्या ११व्या मजल्यावर त्यांच्या बेडरूममध्ये होते आणि त्यांना त्यांचा धाकटा मुलगा जहांगीर (जेह) आणि आया एलियामा फिलिप यांच्या ओरडण्याचा आवाज आला आणि ते जागे झाले. यानंतर तो करीनासोबत त्यांच्या खोलीत पोहोचला, जिथे त्यांनी हल्लेखोराला पाहिले. नॅनी घाबरलेली होती आणि ओरडत होती, तर जेह रडत होता. नॅनीने
 सांगितले की, हल्लेखोराने एक कोटी रुपयांची मागणी केली होती. अभिनेत्याने आरोपीला रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने सैफच्या पाठीवर, मानेवर आणि हातावर चाकूने अनेक वार केले. हल्ल्यात जखमी झालेल्या अभिनेत्याने हल्लेखोराला खोलीत ढकलले आणि त्याला खोलीत बंद केले.

वर्कफ्रंट
वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर आलिया भट रणबीर कपूरसोबत संजय लीला भन्साळींच्या लव्ह अँड वॉरमध्ये दिसणार आहे, ज्यामध्ये विकी कौशल देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Web Title: Now we won't be able to see Raha's glimpse, Alia Bhatt-Ranbir Kapoor took a big decision after the Saif Ali Khan affair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.