"आता सलमाननेही गौरी शोधली पाहिजे...", भाईजानच्या लव्ह लाइफबद्दल आमिर खानने सोडलं मौन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 11:26 IST2025-03-17T11:25:53+5:302025-03-17T11:26:34+5:30
Aamir Khan : वयाच्या ६०व्या वर्षी आमिर खान तिसऱ्यांदा प्रेमात पडला आहे. त्याची दुसरी पत्नी किरण रावपासून विभक्त झाल्यानंतर अवघ्या काही वर्षांनी आमिरला त्याची 'गौरी' सापडली आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त, अभिनेत्याने त्याची गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटची ओळख करून दिली.

"आता सलमाननेही गौरी शोधली पाहिजे...", भाईजानच्या लव्ह लाइफबद्दल आमिर खानने सोडलं मौन
वयाच्या ६०व्या वर्षी आमिर खान (Aamir Khan) तिसऱ्यांदा प्रेमात पडला आहे. त्याची दुसरी पत्नी किरण रावपासून विभक्त झाल्यानंतर अवघ्या काही वर्षांनी आमिरला त्याची 'गौरी' सापडली आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त, अभिनेत्याने त्याची गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅट(Gauri Spratt)ची ओळख करून दिली. फोटो आणि व्हिडिओ न काढण्याच्या अटीवर त्याने गौरीची पापाराझींशी ओळख करून दिली. आता त्याच्या लव्ह लाईफची सर्वत्र चर्चा होत आहे. विशेष म्हणजे आमिर खानचा चांगला मित्र शाहरुख खान(Shah Rukh Khan)च्या पत्नीचे नावही गौरी खान आहे. मात्र, बॉलिवूडचा तिसरा खान म्हणजेच त्यांचा चांगला मित्र सलमान खान (Salman Khan) वयाच्या ६० व्या वर्षीही बॅचलर आहे. ना त्याने लग्न केले आहे अन् नाही तो कोणाला डेट करत आहे. अलिकडेच आमिरने भाईजानच्या लव्ह लाईफबद्दल सांगितले.
नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेनंतर एका पत्रकाराने आमिर खानला सलमानच्या लव्ह लाईफबद्दल मोठा प्रश्न विचारला. हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, पत्रकाराने अभिनेत्याला विचारले, "शाहरुख खानकडे एक गौरी आहे, तुमच्याकडेही एक आहे, आता सलमानचीही...". पत्रकाराच्या प्रश्नाला दुजोरा देताना आमिर म्हणाला, सलमानने गौरीलाही शोधावे का? यानंतर आमिर खान म्हणाला, सलमान आता काय शोधणार? दरम्यान, पापाराझींनी आणखी एक प्रश्न विचारला की, तो आणि शाहरुख सलमानला सेटल होण्यासाठी काही टिप्स देतो का? यावर आमिर म्हणाला, "सलमान त्याच्यासाठी जे चांगले असेल तेच करेल." आमिरने त्याची गर्लफ्रेंड गौरीचीही सलमान आणि शाहरुखशी ओळख करून दिली. याचा खुलासा खुद्द अभिनेत्याने पत्रकार परिषदेत केला.
कोण आहे आमिर खानची गर्लफ्रेंड?
आमिर खानची गर्लफ्रेंड गौरी स्प्रेट घटस्फोटीत आणि एका मुलाची आई आहे. अभिनेत्याच्या मते, ती बंगळुरूमध्ये राहते आणि एका प्रॉडक्शन हाऊसमध्ये काम करते. आमिर आणि गौरी गेल्या २५ वर्षांपासून एकमेकांना ओळखतात, पण त्यांच्या नात्याला दीड वर्षांपूर्वी सुरुवात झाली. गौरीपूर्वी आमिरने दोनदा लग्न केले होते. त्यांची पहिली पत्नी रीना दत्ता आहे, जिच्यापासून त्यांना आयरा-जुनैद ही दोन मुले आहेत आणि त्याची दुसरी पत्नी किरण रावपासून त्यांना एक मुलगा आहे. अभिनेता त्याच्या दोन्ही पत्नींपासून विभक्त झाला आहे, परंतु ते अजूनही चांगले मित्र आहेत.