आता निशाणा सोनू निगमवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 06:13 IST2016-01-16T01:18:05+5:302016-02-07T06:13:05+5:30

बॉ लीवूडच्या 'खाना'वळीत सध्या दोन खानांचे म्हणजेच आमिर आणि सलमान यांचे वाद झाले आहेत हे तर आपल्याला माहितच आहे. ...

Now on the Nisha Sonu Corporation | आता निशाणा सोनू निगमवर

आता निशाणा सोनू निगमवर

लीवूडच्या 'खाना'वळीत सध्या दोन खानांचे म्हणजेच आमिर आणि सलमान यांचे वाद झाले आहेत हे तर आपल्याला माहितच आहे. आता यानंतर सलमानचा मोर्चा गायक सोनू निगमकडे वळला आहे. त्याचे झाले असे की,' गुलशन कुमार यांना इंडस्ट्रीत ३0 वर्षे पुर्ण झाल्यानिमित्त 'सुरों के रंग' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सोनू निगमने गाणे गायलेल्या या कार्यक्रमाला सलमानही उपस्थित होता. जेव्हा सलमान स्टेजवर आला तेव्हा तो असे काही म्हणाला की, ऐकणारे सगळे हैराण झाले. सल्लू म्हणाला की, त्याचा आवाज चांगला असून जर काही टेक्नीक वापरले तर आपला आवाज अजुन चांगला लागतो. त्यामुळे त्याला आता त्याच्या चित्रपटांसाठी सोनु निगम किंवा आणखी कोणत्या गायकाची गरज नाही. सलमानच्या या वक्तव्याचे सोनु ने ट्विटरवर खंडण केले आहे. यात काहीही तथ्य नसल्याचे त्याने म्हटले.

Web Title: Now on the Nisha Sonu Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.