आता बघा, फवाद-दीपिकाची जोडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2016 17:06 IST2016-03-24T00:04:42+5:302016-03-23T17:06:24+5:30

पाकिस्तानचा सुपर टॅलेंटेड अभिनेता फवाद खान याचा ‘कपूर अ‍ॅण्ड सन्स’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटानंतर फवादचे स्टार ...

Now look, Fawad - Deepika's pair | आता बघा, फवाद-दीपिकाची जोडी

आता बघा, फवाद-दीपिकाची जोडी

किस्तानचा सुपर टॅलेंटेड अभिनेता फवाद खान याचा ‘कपूर अ‍ॅण्ड सन्स’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटानंतर फवादचे स्टार एकदम जोरात आहे. बॉलिवूडमधील त्याच्या करिअरने चांगलाच वेग घेतला आहे. नव्या बातमीनुसार,  फवाद लवकरच दीपिका पदुकोण हिच्यासोबत काम करताना दिसणार आहे. खुद्द फवादनेही अलीकडे आपण लवकरच दीपिका सोबत दिसणार असल्याचे टिष्ट्वट करून आपल्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. करण जोहरच्या चित्रपटात फवाद-दीपिकाची जोडी पडद्यावर एकत्र दिसू शकते.अर्थात करण स्वत: या चित्रपटाचे दिग्दर्शन करेल वा नाही, हे सांगता येणार नाही. पण फवाद-दीपिका धर्मा प्रॉडक्शनच्या चित्रपटात एकत्र येतील, अशी पक्की खबर आहे. फवादने धर्मा प्रॉडक्शनच्या कपूर अ‍ॅण्ड सन्समध्ये काम केले आहे. लवकरच ‘ये दिल है मुश्लिक में’ या धर्मा प्रॉडक्शनच्या चित्रपटातही फवाद दिसणार आहे. 
  
 

Web Title: Now look, Fawad - Deepika's pair