आता ‘ढिशूम’ वांद्यात, शिख संप्रदायाची सेन्सॉर बोर्डाकडे तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2016 16:24 IST2016-06-15T10:54:51+5:302016-06-15T16:24:51+5:30
‘उडता पंजाब’चा वाद शमतो ना शमतो तोच आता ‘ढिशूम’ हा आगामी सिनेमा वादात सापडण्याची चिन्हे आहेत. जॉन अब्राहम, वरूण ...

आता ‘ढिशूम’ वांद्यात, शिख संप्रदायाची सेन्सॉर बोर्डाकडे तक्रार
‘ डता पंजाब’चा वाद शमतो ना शमतो तोच आता ‘ढिशूम’ हा आगामी सिनेमा वादात सापडण्याची चिन्हे आहेत. जॉन अब्राहम, वरूण धवन यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटातील एक गाण्यावर शिख कम्युनिटीने आक्षेप नोंदवलाय. होय, यात जॅकलीन फर्नांडिस हिचीही भूमिका आहे. एका गाण्यात जॅकलीन तिच्या शॉर्ट ड्रेसच्या बेल्टमध्ये कृपाण(शिख धर्माचे प्रतिक) लटकवून नाचताना दाखवली आहे. यावर शिख कम्युनिटीने आक्षेप नोंदवला असून हा सगळा प्रकार धार्मिक भावना दुखावणारा असल्याचे म्हटले आहे. गुरुद्वारा मॅनेजमेंट कमिटीने यासंदर्भात सेन्सॉर बोर्डाकडेही तक्रार दाखल केली असून हे अख्खे गाणेच सिनेमातून गाळून टाकण्यात यावे, अशी मागणी केली आहे. शिवाय या गाण्याचे सर्व व्हिडिओ, ट्रेलर युट्यूब व इंटरनेटवरून हटविण्याची मागणीही केली आहे.
![]()