अबब ! जगातील सर्वात उंच इमारतीत या बोल्ड अभिनेत्रीनं विकत घेतलं घर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2020 12:26 IST2020-01-07T12:25:07+5:302020-01-07T12:26:36+5:30

ही अभिनेत्री बोल्ड फोटो व व्हिडिओमुळे असते चर्चेत

Now! This bold actress bought a house in the tallest building in the world | अबब ! जगातील सर्वात उंच इमारतीत या बोल्ड अभिनेत्रीनं विकत घेतलं घर

अबब ! जगातील सर्वात उंच इमारतीत या बोल्ड अभिनेत्रीनं विकत घेतलं घर

जगातील सर्वात उंच इमारतींच्या यादीमध्ये बुर्ज खलिफा प्रथम क्रमांकावर आहे.  सामान्य माणूस असो किंवा श्रीमंत व्यक्ती, बुर्ज खलिफा सारख्या इमारतीत स्वतःचे घर असावे अशी सर्वांची इच्छा असते. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी दुबईमध्ये ही भव्य आणि सुंदर दिसणाऱ्या इमारतीत स्वतःचे घर घेतले आहे आणि या यादीमध्ये आपल्या बोल्ड अंदाजाने सर्वांचे मन जिंकणारी शर्लिन चोप्राचे नाव सुद्धा सामील झाले आहे.

अभिनेत्री शर्लिनने नवीन वर्षाच्या निमित्ताने स्वत:ला बुर्ज खलिफामध्ये एक सुंदर अपार्टमेंट गिफ्ट केले आहे.


अलीकडेच शर्लिन चोप्राने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर आपल्या अपार्टमेंटमध्ये क्लिक केलेले एक सेन्शुअल फोटो शेअर करून ही बाब सांगितली आहे. या फोटोला चाहत्यांची पसंती मिळाली आहे आणि हा फोटो खूप व्हायरल देखील होत आहे. शर्लिनचे बुर्ज खलिफामधील अपार्टमेंट अतिशय भव्य व सुंदर आहे. 


शर्लिन चोप्रा लवकरच मनोरंजनाच्या उद्योगात स्वतःचे ओटीटी प्लॅटफॉर्म लाँच करणार आहे, ज्याची तयारी जोरदार सुरू आहे.

Web Title: Now! This bold actress bought a house in the tallest building in the world