मलायका अरोरापूर्वी अरबाज खानचे होणार ‘दोनाचे चार हात’!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2019 15:50 IST2019-04-21T15:50:00+5:302019-04-21T15:50:01+5:30

मलायका व अर्जुन लवकरच लग्न करणार, असे मानले जात आहे. पण कदाचित मलायकाआधी अरबाज खान हाच लग्न करून मोकळा होणार, असे दिसतेय.

not only malaika arora but arbaaz khan also planning to get married again | मलायका अरोरापूर्वी अरबाज खानचे होणार ‘दोनाचे चार हात’!!

मलायका अरोरापूर्वी अरबाज खानचे होणार ‘दोनाचे चार हात’!!

ठळक मुद्देजॉर्जिया एंड्रियानी आणि अरबाज खानची लव्ह स्टोरी ही आता सगळ्या जगाला माहिती आहे. सध्या दोघे प्रेमाच्या अखंड सागरात बुडाले आहे.

अभिनेता अरबाज खानमलायका अरोरा यांचे नाते मे २०१७ संपले. १९ वर्षे एकत्र संसार केल्यावर एका वळणावर अचानक अरबाज व मलायकाने एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. पुढे कायदेशीर मार्गाने घटस्फोटही घेतला. आता दोघेही आपआपल्या आयुष्यात बरेच पुढे गेले आहेत. एकीकडे मलायका अर्जुन कपूरसोबतच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहेत. तर दुसरीकडे अरबाज विदेशी बाला जॉर्जियाच्या प्रेमात आकंठ बुडाला आहे. मलायका व अर्जुन लवकरच लग्न करणार, असे मानले जात आहे. पण कदाचित मलायकाआधी अरबाज खान हाच लग्न करून मोकळा होणार, असे दिसतेय.


होय, खुद्द अरबाजने याबाबतचे संकेत दिलेत. एका इव्हेंटमध्ये बोलताना अरबाज विवाहसंस्थेवर बोलला. ‘विवाह संस्थेला आपल्या देशात अनन्यसाधारण महत्त्व आहे. अनेकदा लग्न तुटतात. पण याचा अर्थ विवाहसंस्था खराब आहे, असे होत नाही. मी तरूणांना लग्न करण्याचा सल्ला देईल. माझे लग्न ज्या पद्धतीने तुटले, त्याबद्दल मला जराही तक्रार नाही. अचानक काही गोष्टी बिघडल्या आणि लग्न तुटले. पण आता मी योग्य मार्गावर आहे. कदाचित मी नव्याने संसार सुरु करेल. एकदा लग्न अयशस्वी ठरले, मग दुसऱ्यांदा करून काय फायदा, असे मानणाऱ्यांपैकी मी मुळीच नाही. कदाचित मी दुसºयांदा लग्न करेल. अर्थात योग्य वेळी आणि एक योग्य व्यक्ती आयुष्यात आल्यानंतरच मी हा निर्णय घेईल,’ असे अरबाज म्हणाला.


जॉर्जिया एंड्रियानी आणि अरबाज खानची लव्ह स्टोरी ही आता सगळ्या जगाला माहिती आहे. सध्या दोघे प्रेमाच्या अखंड सागरात बुडाले आहे. दोघांना अनेक वेळा सार्वजनिक ठिकाणी आणि पार्टीमध्ये स्पॉट करण्यात आलेय.

Web Title: not only malaika arora but arbaaz khan also planning to get married again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.