​केवळ धोनीचं नाही तर आणखी चौघांना डेट करून चुकलीय ‘जुली2’ची ही अभिनेत्री!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2017 15:59 IST2017-09-18T07:13:03+5:302017-09-18T15:59:02+5:30

साऊथची ‘सनसनी’ राय लक्ष्मी लवकरच ‘जुली2’ या चित्रपटात आपल्याला दिसणार आहे. ‘जुली2’चे हॉट आणि बोल्ड पोस्टर्स शिवाय तितकाच हॉट ...

Not only Dhoni, but four other actors have made a mistake by filing the 'Julie 2'! | ​केवळ धोनीचं नाही तर आणखी चौघांना डेट करून चुकलीय ‘जुली2’ची ही अभिनेत्री!

​केवळ धोनीचं नाही तर आणखी चौघांना डेट करून चुकलीय ‘जुली2’ची ही अभिनेत्री!

ऊथची ‘सनसनी’ राय लक्ष्मी लवकरच ‘जुली2’ या चित्रपटात आपल्याला दिसणार आहे. ‘जुली2’चे हॉट आणि बोल्ड पोस्टर्स शिवाय तितकाच हॉट टीजर रिलीज झाल्यानंतर राय लक्ष्मी कमालीची चर्चेत आली आहे. अर्थात  २००८ च्या आयपीएलदरम्यानही राय लक्ष्मी अशीच चर्चेत आली होती. कारण होते, क्रिकेटपटू महेन्द्र सिंह धोनी याच्यासोबतचे रिलेशन. होय, धोनी आणि राय लक्ष्मी एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा त्यावेळी रंगल्या होत्या. धोनीच्या आयुष्यावर बेतलेल्या ‘एम. एस. धोनी : दी अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटात राय लक्ष्मी व धोनी यांच्या प्रेमकथेचा उल्लेख नाही. पण स्वत: राय लक्ष्मी मात्र या रिलेशनशिपवर बरेच काही बोलली आहे. आत्ताही तिने यानिमित्ताने एक नवा खुलासा केला आहे. धोनी व माझ्यात काय होते, हे आम्हाला ठाऊक़ पण लोक अगदी मी धोनीसोबत लग्न करणार, इथपर्यंत बोलून गेले होते. अर्थात हे खरे नव्हतेच. मी धोनीशी लग्न करणार, हे ऐकून मला विचित्र वाटले होते. त्यामुळेच मी आता या प्रकरणावर मीडियाशी बोलणे टाळते. मला आता धोनीबद्दल काहीही बोलायचे नाही.कारण मी त्याचा प्रचंड आदर करते. धोनीसोबतच्या माझ्या अफेअरबाबत याआधीही खूप काही बोलले गेले आहे. पण धोनीनंतर मी चार लोकांना डेट करून चुकलीय. त्यावर मात्र कुणी काहीच लिहिले नाही वा बोलले नाही. धोनीच्या प्रकरणावर यासाठी चर्चा होते, कारण ती सेनसेशनल बातमी आहे, असे राय लक्ष्मी म्हणाली.

ALSO READ : साऊथची ‘सनसनी’ रायलक्ष्मीचा बोल्ड अवतार! पाहा, ‘जुली२’चा HOT टीजर!

धोनी आज त्याच्या वैवाहिक आयुष्यात आनंदी आहे. त्याची एक मुलगीही आहे. माझ्या व धोनीच्या चर्चेवर आता फुलस्टॉप लावला जावा, असे मला वाटते. काही व्यक्ती आयुष्यात असतात. पण म्हणून उद्याही त्या तुमच्या आयुष्यात राहतीलच, असे नाही. हीच आयुष्याची एक प्रक्रिया आहे, असेही राय लक्ष्मी म्हणाली.
‘जुली2’मध्ये  राय लक्ष्मीने अतिशय बोल्ड कंटेंट दिले आहेत. यावरही ती बोलली. बोल्ड दृश्ये चित्रपटाच्या पटकथेची माणगी आहे. मी केवळ पटकथा ऐकून हा चित्रपट साईन केला. ही स्टोरी प्रत्येक महिलेशी कनेक्ट करणारी आहे, असे ते म्हणाले.

Web Title: Not only Dhoni, but four other actors have made a mistake by filing the 'Julie 2'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.