अक्षयकुमारच्या पाकिटात पत्नी ट्विंकल खन्नाचा नव्हे तर ‘या’ व्यक्तीचा आहे फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2017 20:35 IST2017-09-13T15:03:39+5:302017-09-13T20:35:26+5:30

बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमार याच्याशी संबंधित एक मोठा खुलासा आज आम्ही करणार आहोत. अर्थातच हा खुलासा त्याच्या पर्सनल लाइफशी संबंधित ...

Not only Akshay Kumar's wife Twinkle Khanna, but this person's photo! | अक्षयकुमारच्या पाकिटात पत्नी ट्विंकल खन्नाचा नव्हे तर ‘या’ व्यक्तीचा आहे फोटो!

अक्षयकुमारच्या पाकिटात पत्नी ट्विंकल खन्नाचा नव्हे तर ‘या’ व्यक्तीचा आहे फोटो!

लिवूडचा खिलाडी अक्षयकुमार याच्याशी संबंधित एक मोठा खुलासा आज आम्ही करणार आहोत. अर्थातच हा खुलासा त्याच्या पर्सनल लाइफशी संबंधित आहे. खरं तर अक्षय त्याची पत्नी ट्विंकल खन्नावर प्रचंड प्रेम करतो; मात्र अशातही तो त्याच्या पाकिटात पत्नी ट्विंकलऐवजी दुसºयाच एका व्यक्तीचा फोटो ठेवतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही व्यक्ती नेमकी कोण? तर ती व्यक्ती दुसरी-तिसरी कोणीही नसून, प्रसिद्ध कॉमेडियन अभिनेते चार्ली चॅपलिन आहे. अक्षयकुमारने स्वत:च याबाबतचा खुलासा केला आहे. 

अक्षयने एका मुलाखतीत याविषयी सांगताना माझ्या पाकिटात नेहमीच प्रसिद्ध कॉमेडियन चार्ली चॅपलिन यांचा फोटो असल्याचे त्याने सांगितले. अक्षयकुमार लवरकच छोट्या पडद्यावर ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या शोमधून परतत आहे. हा या शोचा पाचवा सीजन असून, त्यात अक्षय परीक्षकांच्या भूमिकेत असेल. सध्या अक्षय या शोच्या तयारीत व्यस्त आहे. ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’च्या पहिल्या एपिसोडची शूटिंग करताना अक्षयने चार्ली चॅपलिन यांचे तोंडभरून कौतुक केले. त्याने म्हटले की, ‘चार्ली चॅपलिन आजदेखील सर्वात महान मनोरंजनकर्ता आहेत. कदाचित यामुळेच आजही माझ्या पाकिटात त्यांचा फोटो असतो. मी त्यांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीवर आजही विश्वास ठेवतो. 



‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या शोमध्ये अक्षय व्यतिरिक्त मल्लिका दुआ, जाकिर खान आणि हुसेन दलाल हेदेखील परीक्षकाच्या भूमिकेत आहे. असो, अक्षयच्या चित्रपटांविषयी सांगायचे झाल्यास यावर्षी त्याचे दोन चित्रपट रिलीज झाले. दोन्ही चित्रपटांनी बॉक्स आॅफिसवर जबरदस्त यश मिळविले. त्याच्या ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर शंभर कोटींच्या क्लबमध्ये स्थान मिळविले. लवकरच त्याचा ‘पॅडमॅन’ हा चित्रपट रिलीज होणार असून, प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 

Web Title: Not only Akshay Kumar's wife Twinkle Khanna, but this person's photo!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.