'ऐ दिल है मुश्किल'मध्ये नाही तर सलमान खानच्या या ब्लॉकबस्टर सिनेमात होतं 'चन्ना मेरेया' गाणं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 17:45 IST2025-07-15T17:44:35+5:302025-07-15T17:45:01+5:30

'चन्ना मेरेया' हे गाणे 'ऐ दिल है मुश्किल'साठी बनवले गेले नव्हते. ते सलमान खानच्या एका सुपरहिट चित्रपटासाठी बनवण्यात आले होते.

Not in 'Ae Dil Hai Mushkil' but in Salman Khan's blockbuster movie 'Channa Mereya' | 'ऐ दिल है मुश्किल'मध्ये नाही तर सलमान खानच्या या ब्लॉकबस्टर सिनेमात होतं 'चन्ना मेरेया' गाणं

'ऐ दिल है मुश्किल'मध्ये नाही तर सलमान खानच्या या ब्लॉकबस्टर सिनेमात होतं 'चन्ना मेरेया' गाणं

'ऐ दिल है मुश्किल' (Ae Dil Hai Mushkil) या चित्रपटातील 'चन्ना मेरेया' हे सुपरहिट गाणं क्लासिक कल्ट गाण्यांच्या यादीत समाविष्ट आहे. हे भावनिक ब्रेकअप गाणे लोकांना इतके आवडले की ते २७५ दशलक्ष वेळा ऐकले गेले आहे. हे गाणे आजही लोकांच्या आवडत्या यादीत समाविष्ट आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की हे गाणे 'ऐ दिल है मुश्किल' सिनेमासाठी बनवले गेले नव्हते. 

हो, हे खरंय. 'चन्ना मेरेया' हे गाणे 'ऐ दिल है मुश्किल'साठी बनवले गेले नव्हते. ते सलमान खानच्या एका सुपरहिट चित्रपटासाठी बनवण्यात आले होते, परंतु दिग्दर्शकाने ते घेण्यास नकार दिला होता, त्यानंतर ते रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मावर चित्रीत करण्यात आले. याबद्दल अलीकडेच संगीतकार प्रीतमने खुलासा केला आहे.

'चन्ना मेरेया' हे गाणे मुन्नीवर होणार होते चित्रीत

त्याने सांगितले की, 'चन्ना मेरेया' हे गाणे 'ऐ दिल है मुश्किल'साठी नाही तर सलमान खानच्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'बजरंगी भाईजान'साठी बनवण्यात आले होते. हो, कबीर खान हे गाणे 'मुन्नी'वर चित्रीत करू इच्छित होते. पण काही कारणास्तव हे गाणे चित्रपटात समाविष्ट करण्यात आले नाही. प्रीतमने आयएएनएसशी बोलताना सांगितले की, "मी 'बजरंगी भाईजान'साठी 'चन्ना मेरेया' बनवले होते पण ते 'बजरंगी भाईजान'मधून काढून टाकण्यात आले आणि नंतर ते 'ऐ दिल है मुश्किल'मध्ये वापरण्यात आले. सुरुवातीची ओळ तीच होती, पण बोल वेगळे होते." 

सिनेमांबद्दल

कबीर खान दिग्दर्शित 'बजरंगी भाईजान' हा २०१५ चा सुपरहिट चित्रपट होता, ज्यामध्ये सलमान खान व्यतिरिक्त करीना कपूर खान मुख्य भूमिकेत होती. चित्रपटाप्रमाणेच, त्यातील सर्व गाणी देखील चार्टबस्टर ठरली. दुसरीकडे, 'ऐ दिल है मुश्किल' हा चित्रपट देखील २०१६ चा ब्लॉकबस्टर चित्रपट होता. करण जोहर दिग्दर्शित या चित्रपटात रणबीर कपूर, अनुष्का शर्मा, फवाद खान आणि ऐश्वर्या राय बच्चन यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या.

Web Title: Not in 'Ae Dil Hai Mushkil' but in Salman Khan's blockbuster movie 'Channa Mereya'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.