​करिनामुळे नाही तर ‘यामुळे’ रखडला ‘वीरे दी वेडिंग’?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2016 17:22 IST2016-08-31T11:51:23+5:302016-08-31T17:22:09+5:30

‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटाची सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे आणि का नसावी? केवळ हा चित्रपट ‘दिल चाहता है’चे फिमेल वर्जन ...

Not because of Karina, but 'this' stamped 'Veerre The Wedding'? | ​करिनामुळे नाही तर ‘यामुळे’ रखडला ‘वीरे दी वेडिंग’?

​करिनामुळे नाही तर ‘यामुळे’ रखडला ‘वीरे दी वेडिंग’?

ीरे दी वेडिंग’ या चित्रपटाची सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे आणि का नसावी? केवळ हा चित्रपट ‘दिल चाहता है’चे फिमेल वर्जन आहे म्हणून नव्हे तर यातील स्टारकास्टमुळेही लोकांची उत्सूकता शिगेला पोहोचली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच सोनम कपूर आणि करिना कपूर एकत्र येणार आहेत. शिवाय स्वरा भास्कर, शिखा तल्सानिया या दोघीही यात दिसणार आहेत. अलीकडे ‘वीरे दी वेडिंग’ लांबणीवर पडल्याची खबर आली. प्रेग्नंसीमुळे करिनाने या चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे ‘वीरे दी वेडिंग’ रखडला, अशी माहिती समोर आली. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रपट लांबला यामागचे कारण करिनाची प्रेग्नंसी हे नसून बजेट आहे. होय, चित्रपटाचे शूटींग सुरु होण्याआधीच तो ओव्हर बजेट जातो आहे आणि यामुळे निर्मात्यांनी या प्रोजेक्टवर फेरविचार चालवला आहे. निर्मात्यांनी विचार करण्यास वेळ मागून घेतला आहे. त्यामुळे चित्रपट लांबणीवर टाकण्यात आला आहे. चित्रपटास दुसºयांदा बजेट दिले गेले नाहीच तर चित्रपट आणखी लांबणीवर पडू शकतो, इथपर्यंत ऐकवात येते आहे. त्यामुळेच ‘वीरे दी वेडिंग’ रखडण्यामागे करिनाची प्रेग्नंसी कारणीभूत आहे, असे म्हणणे निव्वळ निराधार आहे. स्वत: सोनम कपूरने चित्रपट लांबल्यामागे करिनाची प्रेग्नंसी हे कारण नसल्याचे स्पष्ट केले आहे. एकंदर काय तर आता निर्माते काय निर्णय घेतात, यावरच सगळे अवलंबून असणार आहे. तेव्हा जस्ट, वेट अ‍ॅण्ड वॉच!!
 

Web Title: Not because of Karina, but 'this' stamped 'Veerre The Wedding'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.