अक्षय खन्ना नव्हे तर 'तुंबाड २' मध्ये झळकणार 'हा' अभिनेता; निर्माता सोहम शाहने शेअर केला फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 13:49 IST2026-03-02T13:48:04+5:302026-03-02T13:49:23+5:30
२०१८ साली आलेल्या आणि प्रचंड गाजलेल्या 'तुंबाड' सिनेमाच्या सीक्वलची निर्मिती पुन्हा एकदा सोहम शाह करत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून 'तुंबाड २' मध्ये प्रमुख भूमिकेत अक्षय खन्ना झळकणार असल्याच्या चर्चा होत्या. परंतु आता स्वतः सोहमने याविषयीची मोठी अपडेट दिली आहे.

अक्षय खन्ना नव्हे तर 'तुंबाड २' मध्ये झळकणार 'हा' अभिनेता; निर्माता सोहम शाहने शेअर केला फोटो
गेल्या अनेक महिन्यांपासून 'तुंबाड २' सिनेमाची चांगलीच उत्सुकता आहे. २०१८ साली आलेल्या आणि प्रचंड गाजलेल्या 'तुंबाड' सिनेमाचा हा सीक्वल आहे. या सिनेमाची निर्मिती पुन्हा एकदा सोहम शाह करत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून 'तुंबाड २' मध्ये प्रमुख भूमिकेत अक्षय खन्ना झळकणार असल्याच्या चर्चा होत्या. परंतु आता स्वतः सोहमने याविषयीची मोठी अपडेट दिली आहे. 'तुंबाड २' मध्ये बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकी झळकणार आहे.
'तुंबाड २' मध्ये झळकणार नवाझुद्दीन
बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'तुंबाड २' साठी नवाझुद्दीन सिद्दीकीची वर्णी लागली आहे. सोहम शाहने खास फोटोशूट करुन नवाझुद्दीन सिद्दीकीसोबतचे फोटो शेअर केले आहेत. 'तुंबाड २' साठी नवाझुद्दीन आमच्याशी जोडला गेलाय. हे सांगताना आम्हाला खूप आनंद होतोय. विशेष म्हणजे 'तुंबाड'च्या पहिल्या भागातही नवाझुद्दीन झळकणार होता. परंतु त्यावेळी काही कारणास्तव नवाझुद्दीनला काम करता आलं नाही. त्यामुळे नवाझुद्दीनची ही इच्छा 'तुंबाड २' मध्ये पूर्ण झालीये.
'तुंबाड' सिनेमा जेव्ही रि रिलीज झाला होता तेव्हा सिनेमाच्या शेवटी 'तुंबाड २' ची घोषणा झाली होती. त्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता. पहिल्या भागाप्रमाणे राही बर्वे 'तुंबाड २' च्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार का, हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. याशिवाय 'तुंबाड २' च्या रिलीज डेटचीही अद्याप घोषणा झाली नाहीये. तरीही पुढील वर्षी अर्थात २०२७ ला हा सिनेमा रिलीज होईल, अशी चाहत्यांना आशा आहे.