ऐश्वर्या नाही तर ही अभिनेत्री बनणार होती देवदासची पारो, पण भन्साळींनी अचानक दाखवला बाहेरचा रस्ता
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2024 16:29 IST2024-04-23T16:28:42+5:302024-04-23T16:29:20+5:30
Aishwarya Rai Bachchan : अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने देवदास चित्रपटात पारोची भूमिका साकारली होती. या सिनेमातून ऐश्वर्याने तिच्या एक्सप्रेशन, अभिनय आणि नृत्याने सर्वांची मने जिंकली होती, मात्र फार कमी लोकांना माहित आहे की, ऐश्वर्या आधी दुसऱ्या अभिनेत्रीची या भूमिकेसाठी निवड करण्यात आली होती.

ऐश्वर्या नाही तर ही अभिनेत्री बनणार होती देवदासची पारो, पण भन्साळींनी अचानक दाखवला बाहेरचा रस्ता
माजी मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय(Aishwarya Rai Bachchan)ने आपल्या अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवला आहे. देवदास हा ऐश्वर्याच्या लोकप्रिय चित्रपटांपैकी एक चित्रपट आहे. या चित्रपटात तिने पारोची भूमिका साकारली होती. या सिनेमातून ऐश्वर्याने तिच्या एक्सप्रेशन, अभिनय आणि नृत्याने सर्वांची मने जिंकली होती, मात्र या चित्रपटासाठी करीना कपूर(Kareena Kapoor)ला सर्वप्रथम साइन केले होते हे फार कमी लोकांना माहिती आहे.
फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत करीना कपूरने देवदासमधील पारोच्या भूमिकेसाठी निवड झाल्याचे सांगितले होते. ती म्हणाली की, संजय लीला भन्साळी यांनी देवदास चित्रपटासाठी तिची स्क्रीन टेस्ट घेतली होती आणि तिला साइनिंग अमाउंटदेखील दिली होती. परंतु नंतर तिला चित्रपटातून काढून टाकले. इतकेच नाही तर करीना दुखावली गेली. याबद्दल ती म्हणाला की, ती दुखावली गेली कारण तो माझ्या करिअरचा सुरुवातीचा टप्पा होता. संजयने मला दुखावले, माझ्याकडे काम नसले तरी मी त्याच्यासोबत कधीच काम करणार नाही.
भन्साळींनी कमिटमेंटची गोष्ट नाकारली
करीना कपूरच्या या मुलाखतीनंतर संजय लीला भन्साळी यांनीही प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी एका मुलाखतीत सांगितले की, करीना नीता लुलासोबत त्यांना भेटायला आली होती आणि त्यांच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. यानंतर, तिचे फोटोशूट कॉश्च्युमसोबत झाले. मात्र तिला स्पष्ट केले होते की हे फोटोशूट करीना चित्रपटासाठी अंतिम फेरीत असल्याची पुष्टी करत नाही. फोटोशूटनंतर त्यांनी करीनाला सांगितले होते की, पारोच्या भूमिकेसाठी ऐश्वर्या योग्य आहे. यावर करिनाने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण नंतर ती भडकू लागली.