बोल्ड नोरा फतेहीला या गोष्टीचा होतोय त्रास, व्हिडीओ शेअर करत केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2020 11:59 IST2020-05-05T11:57:08+5:302020-05-05T11:59:58+5:30

बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण करण्यासाठी नोराला खूप संघर्ष करावा लागला.

Nora fatehi is upset she cant sleep at night gda | बोल्ड नोरा फतेहीला या गोष्टीचा होतोय त्रास, व्हिडीओ शेअर करत केला खुलासा

बोल्ड नोरा फतेहीला या गोष्टीचा होतोय त्रास, व्हिडीओ शेअर करत केला खुलासा

आपल्या डान्सच्या माध्यमातून नोरा फतेहीने रसिकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं. नोराने ''स्ट्रीट डान्सर थ्रीडी' मध्ये  आपला जलवा दाखवला. या सिनेमात तिने केलेल्या डान्स सगळीकडेच कौतूक झाले. सत्यमेव जयतेमधील 'दिलबर' गाण्यामुळे घराघरात पोहोचली आहे. 

नोराला झोप येत नाही आहे. कदाचित लॉकडाऊन यामागील कारण असू शकते. नोरा फतेहीने अलीकडेच कबूल केले आहे की जेव्हा ती झोपायचा प्रयत्न करते तेव्हा निद्रानाशचा तिला त्रास होतोय.


नोराने हा खुलासा  इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या एका टिकटॉक व्हिडिओमध्ये केला.  आतापर्यंत या व्हिडीओला 17 लाख लोकांनी बघितले आहे. या व्हिडीओसोबत नोराने एक कॅप्शनसुद्धा दिले आहे, "जेव्हा मी झोपायचा प्रयत्न करते तेव्हा निद्रानाश मला झोपू देत नाही, इतर कोणालाही याचा सामना  करावा लागते आहे का?" नोराने काही दिवसांपूर्वीच टिकटॉकवर पदार्पण केले आहे. 

बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण करण्यासाठी नोराला खूप संघर्ष करावा लागला. त्यावेळी तिला हिंदी बोलता येत नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागला. तिच्यावर अनेक वेळा वाईट कमेंट्स केल्या जायच्या. शाळेत असताना थट्टा केली जायची कारण तिला त्यावेळी डान्स करायला यायचा नाही. मात्र आज डान्ससाठी नोरा प्रत्येक निर्मात्याची पहिली चॉईस बनली आहे.

Web Title: Nora fatehi is upset she cant sleep at night gda