Video: शेअर करताच नोराच्या या व्हिडीओचा धमाका, मिळाले लाखो व्ह्यूज...

By अमित इंगोले | Published: November 3, 2020 10:32 AM2020-11-03T10:32:02+5:302020-11-03T10:32:13+5:30

डान्सबाबत नोरा बॉलिवूडमधील एकापेक्षा एक अभिनेत्रींना मागे सोडत आहे. दिवसेंदिवस नोराची फॅन फॉलोईंग कमालीची वाढत आहे.

Nora Fatehi shares her new dancing video on social media | Video: शेअर करताच नोराच्या या व्हिडीओचा धमाका, मिळाले लाखो व्ह्यूज...

Video: शेअर करताच नोराच्या या व्हिडीओचा धमाका, मिळाले लाखो व्ह्यूज...

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री-डान्सर नोरा फतेहीने एक नवा व्हिडीओ शेअर केला आहे. खास बाब तर ही आहे की, एकाच गाण्यावर जवळपास सेम स्टेप्स असूनही तिच्यासाठी फॅन्स प्रेम अजिबात कमी होताना दिसत नाही. व्हिडीओ शेअर केल्यावर एक तासांच्या आत या व्हिडीओला ५ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. यावरूनही नोराची फॅन्समध्ये असलेली क्रेझ समजून येते.

डान्सबाबत नोरा बॉलिवूडमधील एकापेक्षा एक अभिनेत्रींना मागे सोडत आहे. दिवसेंदिवस नोराची फॅन फॉलोईंग कमालीची वाढत आहे. इतकेच काय तर मोठ्या बॅनरच्या सिनेमांमध्येही नोराला जागा दिली जात आहे. आपल्या खास अंदाजाने ती प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून सोडते. तिने जसा हा व्हिडीओ शेअर केला काही तासातच लाखों व्ह्यूज मिळाले. एका तासात हे व्ह्यूज ५ लाखांवर पोहोचले. (VIDEO : नोरा आणि नताशाचा 'साकी साकी' गाण्यावर डान्स मुकाबला, एकदा बघाल बघतच रहाल.....)

या व्हिडीओत नोरा फतेही तिच्या नुकत्याच रिलीज झालेल्या 'नाच मेरी राणी' गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. तसेच यात ती गुरू रंधावासोबत नाही तर कोरिओग्राफर तेजससोबत धमाकेदार डान्स करताना दिसत आहे.

तेजसने त्याच्या इन्स्टाग्रावरही काही व्हिडीओज शेअर केले आहेत. ज्यात तो गुरू रंधावासोबत डान्स करताना दिसत आहे. गुरू रंधावा आणि नोरा फतेहीचं ''नाच मेरी राणी' हे गाणं रिलीज झालं असून या गाण्याला जबरदस्त रिप्सॉन्स मिळत आहे. 

Web Title: Nora Fatehi shares her new dancing video on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.