Oh No! स्टंट सीन करताना धपकन पडली नोरा फतेही, BTS VIDEO व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2024 19:43 IST2024-02-21T19:41:14+5:302024-02-21T19:43:58+5:30
बॉलिवूडची अभिनेत्री नोरा फतेहीने आज भारतात स्वत:चे स्थान निर्माण केले आहे.

स्टंट सीन करताना धपकन पडली नोरा फतेही, BTS VIDEO व्हायरल
बॉलिवूडची अभिनेत्री नोरा फतेहीने आज भारतात स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. नोरा फतेही तिच्या आयटम साँग्ससाठी खूप प्रसिद्ध आहे. तिने हार्डी संधूच्या ‘क्या बात है’ या गाण्याद्वारे सिनेसृष्टीत एंट्री घेतली. आता नोरा 'क्रॅक' सिनेमातून लवकच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशातच तिचा 'क्रॅक' सिनेमाच्या शुटिंगदरम्यानचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
अभिनेता विद्युत जामवालसोबत 'क्रॅक' सिनेमात नोरा फतेही झळकणार आहे. या व्हिडीओमध्ये विद्युत आणि नोरा स्टंट सीन करताना दिसत आहेत. पण, यातच स्टंट करताना नोरा फतेही जमिनीवर धपकन पडली. नोराचा हा व्हिडीओ पाहून तिच्या चाहत्यांना धक्का बसला. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
नोरा फतेही आणि विद्युत जामवाल यांचा 'क्रॅक' हा चित्रपट येत्या २३ फेब्रुवारी रोजी रिलीज होणार आहे. सध्या नोरा आणि विद्युत या चित्रपटाच्या प्रमोशमध्ये व्यस्त आहे. यासोबत या सिनेमात एमी जॅकसन, अर्जुन रामपाल, जॅकलिन फर्नांडिस हे 'क्रॅक' सिनेमात दिसणार आहे. नोरानं वरूण धवन, श्रद्धा कपूर, नेहा कक्कड, जॉन अब्राहम आणि सलमान खान या प्रसिद्ध कलाकारांसोबत काम केले आहे. तिने दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. तसेच नोराने अनेक टी- सीरिजच्या गाण्यांमध्ये काम केलं.