नो प्रेग्नंसी ब्रेक! नेहा धूपियाने सुरू केले #NoFilterNehaच्या तिसऱ्या सीझनचे शूटींग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2018 12:10 IST2018-09-04T12:04:27+5:302018-09-04T12:10:00+5:30

नेहा धूपियाने अंगद बेदीसोबत लग्न केले आणि ती चर्चेत आली. तूर्तास नेहा प्रेग्नंसी एन्जॉय करतेय. पण सोबतच तिचे कामही सुरू आहे.

 No pregnancy break! neha dhupia starts shoot for nofilterneha season-3 | नो प्रेग्नंसी ब्रेक! नेहा धूपियाने सुरू केले #NoFilterNehaच्या तिसऱ्या सीझनचे शूटींग!

नो प्रेग्नंसी ब्रेक! नेहा धूपियाने सुरू केले #NoFilterNehaच्या तिसऱ्या सीझनचे शूटींग!

नेहा धूपियाने अंगद बेदीसोबत लग्न केले आणि ती चर्चेत आली. नेहा व अंगदच्या लग्नाची बातमी सगळ्यांसाठीच आश्चर्याचा धक्का देणारी होती. लग्नानंतर तीन-चार महिन्यांतचं नेहाने प्रेग्नंट होण्याची बातमी दिली आणि चाहत्यांना दुसरा आश्चर्याचा धक्का बसला. खरे तर लग्नाआधीच नेहा प्रेग्नंट होती. मीडियाला याची भणक लागली होती. पण नेहाने ‘ती मी नाहीचं’ची भूमिका घेतली. पण  ही बातमी लपणारी नव्हतीच. शेवटी तिला ती जगजाहिर करावी लागली. तूर्तास नेहा प्रेग्नंसी एन्जॉय करतेय. पण सोबतच तिचे कामही सुरू आहे. प्रेग्नंसीत काम करायचे नाही, हा गैरसमज दूर करण्याचे काम नेहा करतेय. आता आणखी एक खबर आहे. होय, या बातमीने नेहाचा प्रेग्नंसी ब्रेकवर विश्वास नाही, हे सिद्ध होत आहे.
होय, नेहाचा ‘फिल्टर नेहा’ या लोकप्रीय चॅट शोचे तिसरे सीझन सुरू होत आहे. काल सोमवारपासून नेहाने या चॅट शोचे शूटींग सुरू केले. या शोमध्ये अभिनेता आयुष्यमान खुराणा नेहाचा पहिला गेस्ट बनला. या शोच्या सेटवरचे काही फोटो समोर आले आहेत.
नेहाचा हा शो प्रचंड हिट आहे. या शोची दोन्ही सीझन लोकांनी डोक्यावर घेतलीत. या शोवर आलेल्या अनेक बॉलिवूड स्टार्सनी अनेक रोचक खुलासे केलेत. आता याच्या तिस-या सीझनमध्ये काय धम्माल घडते, ते बघूच.

 गत १० मे रोजी तिने अभिनेता अंगद बेदी याच्याशी साताजन्माच्या गाठी बांधल्या. लग्नानंतर नेहाचे फोटो सोशल मीडियावर सातत्याने शेअर केले जात आहेत. तर काही यूजर्सकडून तिच्यावर टीका केली जात आहे. नेहा धुपिया तिचा पती अंगदपेक्षा दोन वर्षांनी मोठी आहे. 

Web Title:  No pregnancy break! neha dhupia starts shoot for nofilterneha season-3