Neha Dhupia troll victim's husband Angad Bedi made a statement! | नेहा धुपियाला ट्रोल करणाऱ्यांची पती अंगद बेदीने केली बोलतीबंद!

बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल नेहा धुपिया हिने अचानकच लग्नाची बातमी देऊन  अनेकांना धक्का दिला. १० मे रोजी तिने अभिनेता अंगद बेदी याच्याशी साताजन्माच्या गाठी बांधल्या. लग्नानंतर नेहाचे फोटो सोशल मीडियावर सातत्याने शेअर केले जात आहेत. तर काही यूजर्सकडून तिच्यावर टीका केली जात आहे. नेहा धुपिया तिचा पती अंगदपेक्षा दोन वर्षांनी मोठी आहे. नेमका हाच धागा पकडून यूजर्सकडून तिच्यावर अतिशय अश्लाघ्य भाषेत टीका केली जात आहे. मात्र ही बाब अंगदच्या अजिबातच पचनी पडली नसल्याने त्याने ट्रोलर्सला जशास तसे उत्तर दिले आहे. अंगदच्या या उत्तरानंतर ट्रोलर्सची मात्र पूर्ती बोलती बंद झाली आहे. 

अंगदने एका इन्स्टाग्राम यूजर्सला उत्तर देताना लिहिले की, ‘तुझ्या आईने तुला हीच शिकवण दिली काय? तू या पृथ्वीवर ओझं आहेस. कारण तुझ्यासारख्यांमुळेच आपल्या देशाचे नाव बदनाम आहे. तुमच्या माहितीसाठी नेहा धुपिया तेव्हा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली जेव्हा नेहाने अंगदला त्याच्या आगामी ‘सुरमा’ या चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या. नेहाच्या या पोस्टनंतर फॉलोअर्स दोघांच्या वयातील अंतरावरून तिच्यावर टीका करू लागले. काहींनी तर टीका करताना अश्लील भाषेचाही वापर केला. एका यूजरने कॉमेण्ट बॉक्समध्ये लिहिले की, ‘तुझ्यापेक्षा दोन वर्षांनी लहान आहे अंगद बेदी, पती नाही भाऊ आहे तुझा, तू त्याला राखी बांधायला हवी.’ या यूजर्सच्या कॉमेण्टला उत्तर देताना नेहाने रिप्लाय दिला की, ‘सल्ला दिल्याबद्दल धन्यवाद भाऊ, आता एक उपकार कर याच्या-त्याच्या आयुष्यात न डोकावता स्वत:चे आयुष्य जग.’ दरम्यान, लग्न केल्यापासून नेहा सातत्याने ट्रोल्स होताना दिसत आहे. 
Web Title: Neha Dhupia troll victim's husband Angad Bedi made a statement!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.