Sid Kiara Wedding: विकी-कतरिनानंतर सिड-कियारानेही लग्नाआधी घेतला हा निर्णय, पाहुण्यांना केली विनंती
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2023 14:11 IST2023-02-04T13:29:24+5:302023-02-04T14:11:12+5:30
कतरिना कैफ आणि विकी कौशलच्या पावलावर पाऊल ठेवत कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राने ही लग्नाआधी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

Sid Kiara Wedding: विकी-कतरिनानंतर सिड-कियारानेही लग्नाआधी घेतला हा निर्णय, पाहुण्यांना केली विनंती
Sidharth Malhotra Kiara Advani Wedding: बॉलिवूड स्टार्स कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा एकमेकांना डेट केल्यानंतर लग्नबंधनात अडकणार आहेत. 6 किंवा 7 फेब्रुवारीला ते एकमेकांशी लग्नगाठ बांधणार आहेत. लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली असून पाहुणेही जैसलमेरला येऊ लागले आहेत. आता कतरिना कैफ आणि विकी कौशल प्रमाणे, कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनीही नो फोन पॉलिसी फॉलो केली आहे.
नो फोन पॉलिसी
रिपोर्टनुसार, जोडप्याने हॉटेलमधील सर्व पाहुणे आणि कर्मचाऱ्यांना लग्नाचे कोणतेही फोटो आणि व्हिडिओ पोस्ट न करण्याची विनंती केली आहे.
विकी आणि कतरिनाच्या लग्नाच्या वेळीही त्यांनी तशीच विनंती केली आहे. याआधी, अहवालात दावा करण्यात आला होता की बहुप्रतिक्षित लग्नाला अनेक सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत. इंडिया टुडे मधील एका अहवालात असा दावा करण्यात आला आहे की “सिद्धार्थ आणि कियारा निर्माते आणि दिग्दर्शकांसह त्यांच्या काही जवळच्या मित्रांना आमंत्रित करतील.
रिपोर्टनुसार जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेसमध्ये पाहुण्यांसाठी एक लक्झरी व्हिला बुक करण्यात आला आहे. यात सुमारे 80 खोल्या आहेत. इतकंच नाही तर या जोडप्याच्या लग्नात कडेकोट सुरक्षा व्यवस्था देखील ठेवण्यात आली असून, लग्नाआधीपासून ते लग्नापर्यंत सर्व फंक्शन पॅलेसमध्येच ठेवण्यात येणार आहेत. यासोबतच पाहुण्यांना नेण्यासाठी मर्सिडीज बेंझ, जग्वार आणि बीएमडब्ल्यूसह सुमारे ७० कारची व्यवस्था करण्यात आली आहे.