"पैसेच दिले नाहीत", २० वर्षांनंतर राधिका आपटेचा खुलासा; शाहिद कपूरच्या सिनेमासाठी मिळालं नव्हतं मानधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 11:14 IST2025-12-18T11:12:50+5:302025-12-18T11:14:06+5:30
Radhika Apte : राधिका आपटे ही बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या बिनधास्त आणि बेधडक अंदाजासाठीही राधिका खूप प्रसिद्ध आहे. अलीकडेच एका मीडिया मुलाखतीदरम्यान, अभिनेत्रीने तिच्या पदार्पणाच्या चित्रपटाबाबत धक्कादायक खुलासा केला आहे.

"पैसेच दिले नाहीत", २० वर्षांनंतर राधिका आपटेचा खुलासा; शाहिद कपूरच्या सिनेमासाठी मिळालं नव्हतं मानधन
राधिका आपटे ही बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या बिनधास्त आणि बेधडक अंदाजासाठीही राधिका खूप प्रसिद्ध आहे. अलीकडेच एका मीडिया मुलाखतीदरम्यान, अभिनेत्रीने तिच्या पदार्पणाच्या चित्रपटाबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. तिने सांगितले की, त्या चित्रपटासाठी निर्मात्यांनी तिला तिचे मानधन दिले नव्हते. विशेष बाब म्हणजे, राधिकाचा पहिला चित्रपट अभिनेता शाहिद कपूरसोबत होता.
अभिनेत्री राधिका आपटेने नुकतीच इंडियन एक्सप्रेसला मुलाखत दिली. या दरम्यान तिने शाहिद कपूर स्टारर 'वाह! लाइफ हो तो ऐसी' चित्रपटाच्या निर्मात्यांबाबत एक धक्कादायक खुलासा केला. अभिनेत्रीने सांगितले की, "त्या वाईट निर्मात्यांनी मला ना पैसे दिले, ना माझ्या राहण्याची कोणती व्यवस्था केली. जेव्हा मी आणि माझ्या आईने त्यांना कॉन्ट्रॅक्ट साइन करण्याबद्दल विचारले, तेव्हा ते म्हणाले, 'अरे, उर्मिला मातोंडकर हिने सुद्धा कॉन्ट्रॅक्ट साइन केलेले नाही.' मला माहीत नाही की तिने साइन केले होते की नाही, पण त्यांनी आम्हाला अतिशय वाईट वागणूक दिली."
''माझा तो चित्रपट विसरून जाऊ इच्छिते, कारण...''
मुलाखतीत पुढे राधिकाने 'वाह! लाइफ हो तो ऐसी'चे दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्याबद्दलही आपले मत मांडले. ती म्हणाली, "खरं सांगायचं तर, महेश मांजरेकर खूप चांगले व्यक्ती आहेत. म्हणूनच मी माझा तो चित्रपट विसरून जाऊ इच्छिते, कारण त्याचे प्रोडक्शन खूपच खराब होते आणि याबद्दल उघडपणे बोलायला मला अजिबात भीती वाटत नाही." अशा प्रकारे राधिकाने तिच्या पहिल्या चित्रपटाबाबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. या वाईट अनुभवामुळे हा चित्रपट आपल्याला कधीही आठवायला आवडणार नाही, असे तिचे मत आहे.
वर्कफ्रंट
रुपेरी पडद्यानंतर आता राधिका आपटे ओटीटीवरील टॉपची अभिनेत्री बनली आहे. नुकताच तिचा साली मोहब्बत हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्म झी ५वर रिलीज झाला आहे. याशिवाय लवकरच तिचा नेटफ्लिक्सवर रात अकेली है २ हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.