‘दंगल’चे दिग्दर्शक नितेश तिवारींना बनवायचा हॉरर चित्रपट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2017 18:02 IST2017-07-25T12:32:51+5:302017-07-25T18:02:51+5:30

बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक नितेश तिवारी यांना आता हॉरर चित्रपट बनवायचा आहे. नितेश यांनी गेल्यावर्षी आमिर खान स्टारर ब्लॉक बस्टर ...

Nitesh Tiwari to make the horror movie of 'Dangle'! | ‘दंगल’चे दिग्दर्शक नितेश तिवारींना बनवायचा हॉरर चित्रपट!

‘दंगल’चे दिग्दर्शक नितेश तिवारींना बनवायचा हॉरर चित्रपट!

लिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक नितेश तिवारी यांना आता हॉरर चित्रपट बनवायचा आहे. नितेश यांनी गेल्यावर्षी आमिर खान स्टारर ब्लॉक बस्टर ‘दंगल’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. सध्या नितेश ‘बरेली की बर्फी’ या चित्रपटात व्यस्त आहेत. यानंतर ते हॉरर चित्रपट बनविण्याचा विचार करीत आहेत. नितेश बॉलिवूडमधीले प्रसिद्ध दिग्दर्शकांपैकी एक आहेत. ‘दंगल’ चित्रपटात त्यांनी त्यांच्यातील क्षमता दाखवून दिली आहे. अशात ते पुढील काळात कुठल्या प्रोजेक्टवर काम करतील याविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. 

दरम्यान, सध्या त्यांचा ‘बरेली की बर्फी’ हा चित्रपट रिलीज होण्याच्या मार्गावर आहे. वास्तविक त्यांनी हा चित्रपट रिलीज केलेला नाही. परंतु ते या चित्रपटाचे लेखक आहेत, तर त्यांची पत्नी अश्विनी अय्यर या दिग्दर्शक आहेत. ‘बरेली की बर्फी’ या प्रोजेक्टनंतर ते एका हॉरर चित्रपटावर काम करणार आहेत. याविषयी बोलताना नितेश यांनी म्हटले की, मी एकावेळी अनेक पटकथांवर काम करतो. त्यामुळे कोणती स्टोरी केव्हा मनात बसेल हे सांगता येत नाही. 



पुढे बोलताना त्यांनी म्हटले की, ‘मी एक हॉरर चित्रपट बनविण्याविषयी विचार करीत आहे. माझ्या मते, असे काही जॉनर आहेत ज्यामध्ये मी परफेक्ट बसू शकत नाही. परंतु हॉरर चित्रपटाविषयी बोलायचे झाल्यास मी, अशा कथांना न्याय देऊ शकेल.’ नितेश यांनी ‘दंगल’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करून बॉक्स आॅफिसवरील अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केले. चीनमध्ये तर त्यांच्या या चित्रपटाने धूम उडवून दिली. दोन हजार कोटींच्या क्लबमध्ये स्थान मिळविणारा बहुधा हा पहिलाच चित्रपट ठरला आहे. 

ंया चित्रपटात आमिर खान याने कुस्तीपटूची भूमिका साकारली आहे. हानिकारक बापूची आमिरची भूमिका खूपच लोकप्रिय ठरली आहे. सध्या आमिर त्याच्या आगामी ‘ठग्स आॅफ हिन्दोस्तान’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. परंतु अद्यापपर्यंत त्याच्या ‘दंगल’ची क्रेझ कमी झाल्याचे दिसून येत नाही. विदेशात अजूनही हा चित्रपट धूम करीत आहे. 

Web Title: Nitesh Tiwari to make the horror movie of 'Dangle'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.