नीता अंबानींच्या या स्कूलमध्ये शिकतात बॉलिवूड स्टार्सची मुले; अॅडमिशन फिस वाचून बसेल धक्का !
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2017 15:45 IST2017-12-19T10:15:33+5:302017-12-19T15:45:33+5:30
गेल्या शनिवारी बॉलिवूडमधील किंग शाहरूख खान, गौरी खान, ऐश्वर्या राय-बच्चन, हृतिक रोशन यांच्यासह अनेक सेलिब्रिटी मुंबई येथील धीरुभाई अंबानी ...

नीता अंबानींच्या या स्कूलमध्ये शिकतात बॉलिवूड स्टार्सची मुले; अॅडमिशन फिस वाचून बसेल धक्का !
ग ल्या शनिवारी बॉलिवूडमधील किंग शाहरूख खान, गौरी खान, ऐश्वर्या राय-बच्चन, हृतिक रोशन यांच्यासह अनेक सेलिब्रिटी मुंबई येथील धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजित केलेल्या अॅन्युअल डे फंक्शन कार्यक्रमात आपल्या पाल्यांचा उत्साह वाढविताना बघावयास मिळाले. ऐवढ्या मोठ्या स्टार्सना या स्कूलमध्ये बघून अनेकांना असे वाटत आहे की, हे स्कूल फक्त बॉलिवूड सेलेब्सच्या पाल्यांसाठी तर नसावे ना? वास्तविक यामध्ये तथ्यही आहे. कारण बहुतांश सेलेब्रिटींची मुले याच स्कूलमध्ये शिक्षण घेत आहेत. काहींनी शिक्षण घेऊन विदेशात भरारीही घेतली आहे. शाहरूखचा मुलगा अबराम, आमिर खानचा मुलगा आजाद, ऐश-अभिषेकची मुलगी आराध्या, हृतिकचे दोन्ही ऋहान आणि ऋदान ही मुले याठिकाणी सध्या शिकत आहेत. याव्यतिरिक्त इतरही बरेचसे असे स्टार्स आहेत, ज्यांची मुले या स्कूलमध्ये शिक्षण घेत आहेत.
खरं तर या स्कूलमध्ये आपल्या पाल्याला प्रवेश देणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे आहे. कारण याठिकाणी प्रवेश शुल्क हे हजारांत नसून, कित्येक लाखांत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना हे शुल्क परवडण्यापलीकडचे आहे, असे म्हटले तर चुकीचे ठरू नये. नीता अंबानी यांनी २००३ मध्ये हे स्कूल सुरू केले. बांद्रा पूर्वमधील बीकेसी कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या या सात मजली स्कूलमध्ये सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा आहेत. एलकेजीपासून ते दहावीपर्यंतचे शिक्षण याठिकाणी दिले जाते. हिंदुस्तान टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या एका रिपोर्टनुसार या स्कूलचे वार्षिक शुल्क हे लाखात आहे.
![]()
- एलकेजी ते सातवी : १ लाख ७० हजार रूपये.
- आठवी ते दहावी (आयसीएसई बोर्ड) : १ लाख ८५ हजार रूपये.
- आठवी ते दहावी (आयजीसीएसई बोर्ड) : ४ लाख ४८ हजार रूपये
(वरील शुल्क हे दरवर्षासाठी आकारले जाते)
दरम्यान, या स्कूलमध्ये सध्या शाहरूखचा मुलगा अबराम, ऐश-अभिषेकची मुलगी आराध्या, आमिरचा मुलगा आजाद, सोनू निगमचे दोन्ही मुले, हृतिकचे दोन्ही मुले, विधू विनोद चोपडा आणि अनुपमा चोपडाची मुलगी यूनी, लारा दत्ताची मुलगी सायरा, चंकी पांडेची मुलगी रियासा यांच्या व्यतिरिक्त सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम, श्रीदेवीची मुलगी खुशी कपूर, अनुराग कश्यपची मुलगी आलिया, शाहरूखची मुलगी सुहाना आदी या शाळेचे विद्यार्थी राहिले आहेत.