'ही' होती Satish Kaushik यांची अखेरची इच्छा; स्वप्न पूर्ण होताहोता राहिलं अपूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2023 14:39 IST2023-03-14T14:38:27+5:302023-03-14T14:39:25+5:30

Satish kaushik: बॉलिवूडमध्ये प्रतिष्ठेचं स्थान निर्माण करणाऱ्या सतीश कौशिक यांनी अचानकपणे घेतलेल्या एक्झिटमुळे त्यांची एक इच्छा अपूर्ण राहिली आहे.

nishant kaushik revealed bollywood actor satish kaushik last wish | 'ही' होती Satish Kaushik यांची अखेरची इच्छा; स्वप्न पूर्ण होताहोता राहिलं अपूर्ण

'ही' होती Satish Kaushik यांची अखेरची इच्छा; स्वप्न पूर्ण होताहोता राहिलं अपूर्ण

दिग्गज बॉलिवूड अभिनेता, दिग्दर्शक सतीश कौशिक(Satish Kaushik) यांचं काही दिवसांपूर्वीच निधन झालं. हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बॉलिवूडमध्ये प्रतिष्ठेचं स्थान निर्माण करणाऱ्या सतीश कौशिक यांनी अचानकपणे घेतलेल्या एक्झिटमुळे त्यांची एक इच्छा अपूर्ण राहिली आहे. त्यांचा पुतण्या निशांत कौशिक याने सतीश यांच्या अखेरच्या इच्छेविषयी भाष्य केलं आहे.

अलिकडेच निशांत याने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने सतीश कौशिक, त्यांचं कुटुंबीय यांच्याविषयी भाष्य केलं. सोबतच सतीश यांची एक इच्छा अपूर्णच राहिलं असंही त्याने सांगितलं.

सतीश कौशिक यांच्या १० वर्षाच्या लेकीने शेअर केला हृदयस्पर्शी फोटो; चाहत्यांनाही आलं गहिवरुन

काय होती सतीश कौशिक यांची अखेरची इच्छा?

सतीश कौशिक यांना स्वत:चा एक भव्य स्टुडिओ उभारायचा होता. यासाठी ते प्रयत्नही करत होते. मात्र, त्यांची ही इच्छा अपूर्णच राहिली. परंतु, अनुपम खेर आणि बोनी कपूर यांच्या मदतीने सतीश यांची अखेरची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही करु, असं निशांत म्हणाला.

सतीश यांच्या निधनामुळे पत्नी अन् मुलगी पडली एकाकी

सतीश यांच्या निधनामुळे त्यांची पत्नी आणि मुलगी दोघीही एकदम कोलमडून गेल्या आहेत. घरी आलेल्या कोणत्याही व्यक्तीसाठी वंशिका बोलत नाही. ती एकाकी शांत झाली आहे, असंही निशांतने सांगितलं.

दरम्यान, सतीश कौशिक यांनी फार्म हाऊसमध्ये पार्टी केली आणि त्यानंतर एकाकी त्यांची प्रकृती खालावली. त्यांना तात्काळ रुग्णालयातही दाखल करण्यात आलं. परंतु, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.


 

Web Title: nishant kaushik revealed bollywood actor satish kaushik last wish