रात्री हेल्मेट घालून झोप! सचिन तेंडुलकरने लग्नबेडीत अडकलेल्या विराट कोहलीला दिली टिप्स!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2017 12:11 IST2017-12-12T05:58:43+5:302017-12-12T12:11:05+5:30
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हे दोघे काल सोमवारी इटलीत विवाहबद्ध झालेत. हे लग्न ...

रात्री हेल्मेट घालून झोप! सचिन तेंडुलकरने लग्नबेडीत अडकलेल्या विराट कोहलीला दिली टिप्स!!
भ रतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हे दोघे काल सोमवारी इटलीत विवाहबद्ध झालेत. हे लग्न अतिशय सीक्रेट ठेवले गेले होते. त्यामुळे लग्न होईपर्यंत केवळ या लग्नाची चर्चा तितकी होती. प्रत्यक्षात विरूष्काने लग्नाची घोषणा केली आणि यानंतर विरूष्कावर शुभेच्छांचा जणू पाऊस पडला. यात सर्वाधिक खास ठरला तो ‘क्रिकेटचा देव’ सचिन तेंडुलकर याने विरूष्काला दिलेला शुभेच्छा संदेश.
आम्ही एकमेकांना सदैव प्रेम बंधनात राहण्याचे वचन दिले आहे. तुम्हा सर्वांच्या प्रेमाने हा दिवस आणखीच खास होईल. आमच्या आयुष्याचा हिस्सा बनल्याबद्दल धन्यवाद, असे tweet करत सोमवारी रात्री साडे आठच्या सुमारास विरूष्काने लग्न झाल्याचे जाहिर केले. यानंतर रात्री १० वाजून ११ मिनिटाला सचिनने सोशल मीडियावरून विराटला लग्नाच्या शुभेच्छा दिल्यात. ‘अभिनंदन विराट, वैवाहिक जीवन आनंदमयी ठरो,’ असे सचिनने लिहिले. विराटनेही लगेच सचिनच्या या शुभेच्छांच्या स्वीकार केला. शिवाय काही टिप्स? असा खट्याळ प्रश्नही त्याने सचिनला विचारला. मग काय,या प्रश्नावर सचिनने विराटची चांगलीच ‘विकेट’ घेतली. ‘रात्री हेल्मेट घालून झोप,’ असा सल्ला सचिनने विराटला दिला. आता सचिनचा हा सल्ला ऐकून विराट व अनुष्काची काय स्थिती झाली असणार, याचा अंदाज तुम्ही बांधू शकताच. विराट व अनुष्का दोघेही सचिनचे हे tweet वाचून पोट धरून हसत सुटले असणार...
![]()
ALSO READ : wedding album : पाहा, विराट कोहली व अनुष्का शर्मा यांच्या हळद-मेहंदी ते सप्तपदीपर्यंतचे फोटो!
विराट-अनुष्काची लव्ह स्टोरी चार वर्षांपूर्वी सुरु झाली होती. त्यावेळी हे दोघे पहिल्यांदा एका कमर्शिअल अॅडमध्ये एकत्र झळकले होते. या जाहिरातीच्या सेटवर दोघांमध्ये जवळीक वाढली, हळूहळू मैत्री झाली आणि लवकरच या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. विराट साउथ आफ्रिकेच्या टूरवरुन परतल्यानंतर अनुष्काने त्याला रिसीव्ह करण्यासाठी कार पाठवल्यानंतर दोघांची लव्ह स्टोरी उघड झाली होती. अर्थात विराट-अनुष्काने कधीही आपल्या नात्याची कबुली दिली नव्हती. अनुष्का नेहमीच विराटला आपला चांगला मित्र असल्याचे सांगत होती.