दीपिकाला हवा नवा भाडेकरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2016 10:17 IST2016-03-01T17:17:22+5:302016-03-01T10:17:22+5:30
सध्या हॉलिवूडमध्ये बिझी असलेली दीपिका पदुकोणला आपले जुने घर भाड्याने द्यायचे आहे. अभिनेता रणबीर कपूरसोबत प्रेमसंबंधात असताना दीपिकाने पाली ...

दीपिकाला हवा नवा भाडेकरू
स ्या हॉलिवूडमध्ये बिझी असलेली दीपिका पदुकोणला आपले जुने घर भाड्याने द्यायचे आहे. अभिनेता रणबीर कपूरसोबत प्रेमसंबंधात असताना दीपिकाने पाली हिल येथे एक अलिशान फलॅट घेतला होता. रणबीरनेच दीपिकाला हे घर भेट दिल्याची चर्चाही त्यावेळी चांगलीच रंगली होती. पण रणबीरशी ब्रेकअप झाले आणि दीपिकाचे मन या घरात रमेनासे झाले. चार वर्षांपूर्वी दीपूने हे घर खाली करीत प्रभादेवी येथील चार बीएचके घरामध्ये राहायला गेली. जुने घर विकण्याऐवजी तिने ते भाड्यावर दिले होते. काही दिवसांपूर्वी येथे राहत असलेल्या भाडेकरूचा करार संपला. त्यामुळे दीपूने आता नव्या भाडेकरूचा शोध चालवला आहे. बघूया, दीपिकाला कोणता भाडेकरू मिळतो ते?