नवी जोडी जमणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2016 16:37 IST2016-07-04T11:07:12+5:302016-07-04T16:37:12+5:30
जॉली एलएलबी या चित्रपटात अर्शद वारसीने प्रमुख भूमिका साकारली होती. पण या चित्रपटाच्या सिक्वलची कथा ही पूर्णपणे वेगळी असल्याने ...

नवी जोडी जमणार
ज ली एलएलबी या चित्रपटात अर्शद वारसीने प्रमुख भूमिका साकारली होती. पण या चित्रपटाच्या सिक्वलची कथा ही पूर्णपणे वेगळी असल्याने चित्रपटात वकिलाची भूमिका अर्शदने न करता दुसऱ्या कोणत्यातरी अभिनेत्याने करावी असे निर्मात्यांनी ठरवले होते. सुरुवातीला या भूमिकेसाठी बोमन इराणीचा विचार कऱण्यात आला होता. पण आता ही भूमिका अक्षय कुमार साकारणार आहे. या चित्रपटात अक्षयसोबत अभिनेत्री हुमा कुरेशी प्रमुख भूमिकेत झळकणार असल्याची चर्चा आहे. अक्षय आणि हुमाने अद्याप कोणत्याही चित्रपटात एकत्र काम केलेले नाही. पण या चित्रपटाची पटकथा ही हुमाला खूप आवडल्याने तिने या चित्रपटात काम करायचे ठरवले आहे. त्यामुळे अक्षय आणि हुमा ही नवी जोडी प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.