अमिताभ बच्चन यांना चाहत्यांनी दिला विश्रांती घेण्याचा सल्ला, वाचा काय आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2020 13:57 IST2020-02-24T13:55:56+5:302020-02-24T13:57:20+5:30

अमिताभ यांनी एक पोस्ट ट्विटरवर टाकल्यानंतर त्यांना त्यांच्या चाहत्यांनी चक्क विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.

netizens ask amitabh bachchan why didn't you sleep? | अमिताभ बच्चन यांना चाहत्यांनी दिला विश्रांती घेण्याचा सल्ला, वाचा काय आहे कारण

अमिताभ बच्चन यांना चाहत्यांनी दिला विश्रांती घेण्याचा सल्ला, वाचा काय आहे कारण

ठळक मुद्देअमिताभ यांच्या या ट्वीटवर नेटिझन्सने भन्नाट रिप्लाय दिले आहेत. तुम्ही कॉम्प्युटरजींना या प्रश्नाचे उत्तर विचारा त्यांना हे उत्तर नक्कीच माहीत असेल असे एकाने उत्तर दिले आहे. तर काहींनी तुम्ही अजूनपर्यंत झोपला नाहीत का? असे विचारले आहे.

अमिताभ बच्चन सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. ते नेहमीच सोशल मीडियावर काही ना काही पोस्ट करत असतात. विशेषतः आपल्याला त्यांच्या वडिलांच्या कविता अथवा काही जोक्स त्यांच्या ट्विटरवर वाचायला मिळतात. पण त्यांनी नुकतीच एक पोस्ट ट्विटरवर टाकल्यानंतर त्यांना त्यांच्या चाहत्यांनी चक्क विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.

अमिताभ यांनी रविवारी रात्री 2.30 च्या सुमारास एक ट्वीट केले. या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिले होते की, माझ्या कल्पांना सत्यात उतरवणाऱ्या दोन गोष्टी म्हणजे लेन्स आणि लाईट... कॅमेरा आणि कॅमेरामन यांचे नेहमीप्रमाणेच मी आजही आभार मानतो... चष्म्याचा फॅशन म्हणून वापर करायला कोणी सुरुवात केली हे कोणी सांगू शकते का? त्यांनी या सोबतच दोन फोटो ट्विटवर पोस्ट केले आहेत.

अमिताभ यांच्या या ट्वीटवर नेटिझन्सने भन्नाट रिप्लाय दिले आहेत. तुम्ही कॉम्प्युटरजींना या प्रश्नाचे उत्तर विचारा त्यांना हे उत्तर नक्कीच माहीत असेल असे एकाने उत्तर दिले आहे. तर काहींनी तुम्ही अजूनपर्यंत झोपला नाहीत का? सर झोपा... काय झाले तुम्हाला झोप येत नाही का? असे देखील प्रश्न त्यांना सोशल मीडियाद्वारे विचारले आहेत. तसेच एकाने तर मी तुमचा खूप मोठा फॅन आहे. पण अभिषेकचे करियर चांगले चाललेले नाही असे लोक म्हणतात हे खरं आहे का... मी अभिषेक सरांचा देखील मोठा फॅन आहे... सर प्लीज याचे उत्तर द्या... अशी कमेंट लिहिली आहे.

बिग बींच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर अमिताभ बच्चन लवकरच रणबीर कपूर आणि आलिया भटसोबत 'ब्रह्मास्त्र' मध्ये दिसणार आहेत. यासोबत ते आयुष्मान खुराणासोबत 'गुलाबो सिताबो' मध्ये झळकणार आहेत. याव्यतिरिक्त ते चेहरे आणि झुंड या चित्रपटातही काम करताना दिसणार आहे.

Web Title: netizens ask amitabh bachchan why didn't you sleep?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.