Taruni Sachdev : अवघ्या 14 व्या वर्षी जग सोडून गेली होती ‘रसना गर्ल’, आधीच लागली होती मृत्यूची चाहूल!!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2023 03:52 PM2023-01-20T15:52:54+5:302023-01-20T15:53:42+5:30

Taruni Sachdev : नेपाळमध्ये अलीकडे झालेल्या विमान दुर्घटनेनं संपूर्ण जगाला हादरवून सोडलं. २०१२ साली नेपाळच्या जॉमसम परिसरात असंच एक विमान कोसळलं होतं आणि या अपघातात भारताची लोकप्रिय बालकलाकार तरूणी सचदेव हिनं आपले प्राण गमावले होते.

Nepal plane crash tragedy rasna girl taruni sachdev father recalls memory of his child death | Taruni Sachdev : अवघ्या 14 व्या वर्षी जग सोडून गेली होती ‘रसना गर्ल’, आधीच लागली होती मृत्यूची चाहूल!!

Taruni Sachdev : अवघ्या 14 व्या वर्षी जग सोडून गेली होती ‘रसना गर्ल’, आधीच लागली होती मृत्यूची चाहूल!!

googlenewsNext

नेपाळमध्ये अलीकडे झालेल्या विमान दुर्घटनेनं संपूर्ण जगाला हादरवून सोडलं. २०१२ साली नेपाळच्या जॉमसम परिसरात असंच एक विमान कोसळलं होतं आणि या अपघातात भारताची लोकप्रिय बालकलाकार तरूणी सचदेव (Taruni Sachdev ) हिनं आपले प्राण गमावले होते. तरूणीची आई गीता सचदेव ही सुद्धा या अपघातात मृत्युमुखी पडली होती. आपली मुलगी आणि पत्नी गमावलेल्या हरिश सचदेव यांना जेव्हा नेपाळ विमान दुर्घटनेविषयी समजलं, तेव्हा त्यांच्या जखमा पुन्हा ताज्या झाल्या. एका मुलाखतीत त्यांनी त्या कटू दिवसाबद्दल सांगितलं.

आय लव्ह यू रसना म्हणत सर्वांचं मनं जिंकणाऱ्या चिमुकल्या तरूणीचा 14 मे 2012 रोजी 14 वा वाढदिवस होता. त्या दिवशी ती आणि तिची आई विमानातून प्रवास करत होते. नेपाळच्या अग्नि एअर फ्लाइटचा सीएचटी विमानात 16 भारतीय, 2 डॅनिश रहिवासी आणि तीन चालकाचे असे दल होते. अचानक सकाळी 9.45 वाजण्याच्या सुमारास या विमानाला अपघात झाला व विमानाचे अक्षरश: तुकडे झाले. त्या अपघातात 15 लोक ठार झाले़ यात तरूणी व तिच्या आईचा सहभाग होता़ विमानातील सहा प्रवासी मात्र सुदैवाने बचावले होते.

अलीकडे नेपाळमध्ये पुन्हा विमानाचा अपघात झाला आणि तरूणीच्या वडिलांना तो दिवस आठवला. एका मुलाखतीत ते म्हणाले, “जेव्हा मी विमान अपघाताची बातमी ऐकली, तेव्हा माझा राग पुन्हा अनावर झाला. अजूनही अशा घटना घडत आहेत. अशा दुर्घटनेत किती जणांनी आपले प्राण गमावले आणि आणखी किती लोकांचे प्राण त्यांना घ्यायचे आहेत. त्यांची विमानंच खूप जुनी आहेत. स्वत:च्या फायद्यासाठी ते इतरांच्या जीवाचीही पर्वा करत नाहीत. माझी मुलीने आणि पत्नीनेसुद्धा अशाच दुर्घटनेत आपला जीव गमावला होता. आजही   अशा घटना कानावर पडल्या की माझं मन अस्वस्थ होतं.

या अपघातात प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खाला मी समजू शकतो. त्या दिवशी तेव्हा मुंबईत होतो आणि माझी पत्नी मुलीसह नेपाळला गेले होते. माझ्या मुलीची नेपाळ जायची इच्छा नव्हती. कारण तिला गोव्याला फिरायला जायचं होतं.  बाबा आपण गोव्याला जाऊयात आणि तिथे मी पॅराग्लायडिंग करेन, असं ती मला म्हणाली होती. पण माझी पत्नी तिच्या टीमसोबत दर्शनासाठी नेपाळला जात होती, त्यामुळे तिने तरूणीलाही सोबत नेलं. कदाचित माझ्या मुलीला त्या अपघाताची चुणूक लागली असावी.  काहीतरी वाईट घडणार आहे, असं तिला जाणवलं असावं. विमानात चढताच तिने तिच्या एका मैत्रिणीला मेसेज केला होता. जर विमान क्रॅश झालं तर मी सांगू इच्छिते की.. आय लव्ह यू, असं तिने त्या मॅसेजमध्ये लिहलं होतं.
विमान अपघातानंतर बचाव कार्यादरम्यान माझ्या पत्नीचं बरंचसं सामान चोरीला गेलं होतं. इतकंच नव्हे तर माझ्या पत्नीचा व मुलीचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी मला नेपाळमध्ये बरंच भटकावं लागलं होतं.”


 
वाढदिवसाच्या दिवशीच अपघात...
14 मे 2012 रोजी तरूणीचा 14 वा वाढदिवस होता. त्या दिवशी ती आणि तिची आई विमानातून प्रवास करत होते. नेपाळच्या अग्नि एअर फ्लाइटचा सीएचटी विमानात 16 भारतीय, 2 डॅनिश रहिवासी आणि तीन चालकाचे असे दल होते. अचानक सकाळी 9.45 वाजण्याच्या सुमारास या विमानाला अपघात झाला व विमानाचे अक्षरश: तुकडे झाले. त्या अपघातात 15 लोक ठार झाले़ यात तरूणी व तिच्या आईचा सहभाग होता़ विमानातील सहा प्रवासी मात्र सुदैवाने बचावले होते.
मस्करीमध्ये घेतला होता मित्रांचा निरोप...

नेपाळला जाण्यापूर्वी तरूणीने आपल्या सर्व मित्रांना मिठी मारत निरोप घेतला होता. ‘ही आपली शेवटची भेट आहे...’, असे मित्रांना मिठी मारताना ती मस्करी म्हणाली होती. तिचे हे शब्द सर्वांनी हसण्यावर नेले होते. ती भेट खरोखरच शेवटची भेट असेन, असे कुणालाच वाटले नव्हते. पण नियतीच्या मनात वेगळेच काही होत़े. तिच्या मित्रांनी सांगितल्यानुसार, तरुणी याआधी अनेकदा ट्रिपवर गेली होती. पण त्यापूर्वी कधीही तिने त्यांना मिठी मारली नव्हती किंवा असा निरोप घेतला नव्हता. पण कदाचित तरूणीला नकळत का होईना तिच्या मृत्यूची चाहूल लागली असावी... तरूणी च्या अचानक जाण्यामुळे फिल्म इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला होता. रसना, कोलगेट, आयसीआयसीआय बँक, रिलायन्स मोबाइल, एलजी, कॉफी बाइट, गोल्ड विनर, शक्ती मसाला यासारख्या उत्पादनांसाठी अनेक दूरदर्शन जाहिरातींमध्ये तरूणीने काम केले होते. अगदी त्या काळातील ती सर्वात बिझी बाल मॉडेल होती.

तरुणीने स्वत: मंदिरातील अनेक उत्सवांच्या अनेक नाटकांमध्येही भाग घेतला होता. तरूणी वयाच्या 5 व्या वर्षी चित्रपटसृष्टीत आली. आणि तीही तिच्या काळातील सर्वाधिक कमाई करणारी बाल कलाकार ठरली होती. स्टार प्लसचा शो ‘क्या आप पाचवी पास से तेज है?’ या स्पर्धेतही स्पर्धक होती. त्यावेळी शाहरुख खान हा शो होस्ट करत असे. त्यांनी 2004 मध्ये मल्याळम चित्रपट ‘वेल्लीनक्षत्रम’ मधून डेब्यू करत तिने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. ‘पा’ या सिनेमात तिने अमिताभ बच्चन यांच्या वर्गमैत्रिणीची भूमिका साकारली होती.

Web Title: Nepal plane crash tragedy rasna girl taruni sachdev father recalls memory of his child death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.