​ना सारा , ना तारा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2016 22:09 IST2016-09-19T16:39:47+5:302016-09-19T22:09:47+5:30

सन २०१२ मध्ये करण जोहरचा ‘स्टुडंट आॅफ दी ईअर’ आला आणि तुफान गाजला. आलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रा आणि वरूण ...

Neither Sarah, nor star ... | ​ना सारा , ना तारा...

​ना सारा , ना तारा...

२०१२ मध्ये करण जोहरचा ‘स्टुडंट आॅफ दी ईअर’ आला आणि तुफान गाजला. आलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रा आणि वरूण धवन या तिघांनी आॅनस्क्रीन धम्माल केली. आता याच सुपरडुपर हिट चित्रपटाचा सिक्वल येतो आहे आणि टायगर श्रॉफ यात मुख्य भूमिकेत असणार आहे. आता टायगरच्या अपोझिट कोणत्या दोन अभिनेत्री असणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण सैफ अली खानची मुलगी सारा खान आणि टीव्ही अभिनेत्री तारा सुतारिया या दोघींची नावे यासाठी चर्चेत आहेत. पण याबाबत धर्मा प्रॉडक्शनच्या अंतर्गत सूत्रांना विचारण्यात आले आणि त्यांनी वेगळीच माहिती दिली. ना सारा , ना तारा...असे या सूत्रांनी स्पष्ट केले. एकंदर काय तर टायगरच्या अपोझिट अभिनेत्रींची नावे अद्याप ठरायची आहेत. सो, वेट अ‍ॅण्ड वॉच!!
 
 

Web Title: Neither Sarah, nor star ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.