ना सलमान, अन् नाही आमिर खान, हा सुपरस्टार आहे प्रियंका चोप्राचा फेवरिट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2024 17:02 IST2024-10-26T17:01:38+5:302024-10-26T17:02:55+5:30
Priyanka Chopra : प्रसिद्ध बॉलिवूड आणि हॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा तिच्या नवीन लूकसाठी आणि हॉलिवूडमधील तिच्या दमदार भूमिकांसाठी ओळखली जाते.

ना सलमान, अन् नाही आमिर खान, हा सुपरस्टार आहे प्रियंका चोप्राचा फेवरिट
प्रसिद्ध बॉलिवूड आणि हॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) तिच्या नवीन लूकसाठी आणि हॉलिवूडमधील तिच्या दमदार भूमिकांसाठी ओळखली जाते. प्रियंकाने अनेक प्रसंगी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानला तिचा आवडता स्टार म्हटले आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की, प्रियांकाने शाहरुख खान तिचा आवडता हिरो असल्याचा खुलासा केलेला पहिला प्रसंग कोणता होता.
प्रियंका चोप्रानेसलमान खानसोबत ‘मुझसे शादी करोगी’ या चित्रपटात आणि शाहरुख खानसोबत डॉन २ मध्ये काम केले होते. मात्र आमिर खानसोबत कधीही काम केले नाही. तिने आतापर्यंतच्या कारकिर्दीत जवळपास प्रत्येक अभिनेत्यासोबत काम केले आहे. पण शाहरुख खान आपला आवडता स्टार असल्याचं ती सांगते. तिने अनेक ठिकाणी याचा उल्लेख केला आहे.
मी शाहरुख खानची खूप मोठी चाहती
२००६ मध्ये सिमी गरेवालला दिलेल्या मुलाखतीतही प्रियंकाने याचा खुलासा केला होता. प्रियांकाने सांगितले होते की, आपण शाहरुखची खूप मोठी फॅन असल्याचे कबूल केले होते. शाहरुख खान, सलमान खान, अभिषेक बच्चन, आमिर खान आणि हृतिक रोशनसह अनेक बॉलिवूड कलाकारांची नावे तिने गंमतीने घेतली. तसेच तिला एका चांगल्या व्यक्तीमध्ये काय दिसते, यावर ती म्हणाली, 'शाहरुख खानची जादू, हृतिक रोशनचा कमकुवतपणा, अभिषेक बच्चनचे धाडस, सलमान खानचा लूक, अजय देवगणचा तडफदारपणा, आमिर खानचा प्रामाणिकपणा. ती म्हणाली, मला वाटते की मी शाहरुखची खूप मोठी फॅन आहे.
वर्कफ्रंट
प्रियंकाने शाहरुख खानसोबत 'डॉन २' चित्रपटात काम केले होते. चित्रपट खूप आवडला. फार कमी लोकांना माहित असेल की प्रियंकाची शाहरुखशी पहिली भेट २००० मध्ये मिस इंडिया वर्ल्ड स्पर्धेदरम्यान झाली होती, जिथे शाहरुख जज म्हणून आला होता. सध्या प्रियंका तिच्या 'सिटाडेल सीझन २'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यामध्ये ती एजंट नादिया सिंगच्या भूमिकेत दिसणार आहे.