NEIL NITIN MUKESH'S WEDDING: कॅटरिना कैफला पाहताच का पळाली युलिया वेंटर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2017 10:13 IST2017-02-18T04:41:34+5:302017-02-18T10:13:26+5:30

बॉलीवूड अभिनेता नील नितीन मुकेशचे लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले. लग्नाच्या रिसेप्शनला मनोरंजन विश्वातील अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली. ज्यामध्ये ...

NEIL NITIN MUKESH'S WEDDING: Yulia Venter escaped seeing Katrina Kaifa? | NEIL NITIN MUKESH'S WEDDING: कॅटरिना कैफला पाहताच का पळाली युलिया वेंटर?

NEIL NITIN MUKESH'S WEDDING: कॅटरिना कैफला पाहताच का पळाली युलिया वेंटर?

लीवूड अभिनेता नील नितीन मुकेशचे लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले. लग्नाच्या रिसेप्शनला मनोरंजन विश्वातील अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली. ज्यामध्ये अमिताभ बच्चन, रेखा, जया बच्चन, मधूर भंडारकर, स्वरा भास्कर, सूरज बडजात्या यांचा समावेश होता. परंतु यावेळी सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते सलमान खानच्या दोन गर्लफ्रेंड्सनी.

होय आम्ही बोलतोय सलमान खानची रिसेंट गर्लफ्रेंड युलिया वेंटर आणि एक्स गर्लफ्रेंड कॅटरिना कैफबद्दल. आता सल्लूमियां आणि कॅट ब्रेक-अपनंतर एकमेकांचे अजुनही चांगले मित्र आहेत; पण युलिया आपल्या बॉयफ्रेंडच्या या पूर्व प्रेयसीसोबत फारशी फ्रेंडली नसल्याचे दिसून आले.

त्याचे झाले असे की, नील नितीन मुकेशच्या रिसेप्शनला युलिया सलमानच्या कारमध्ये आली. ती येताच फोटोग्राफर्सनी तिला कॅमेऱ्यात कैद करण्यास सुरूवात केली. नेहमी मीडियापासून दूर राहणारी युलिया यावेळी मात्र आनंदाने पोज देत होती. त्यानंतर ती व्हेन्यूमध्ये गेली. इथपर्यंत सर्व काही सुरळीत होते. आतमध्ये ती नव वधू-वराला भेटली, उपस्थित काही पाहुण्यांशीही बोलली.

                                            salman iulia kat

ती आल्याच्या पाचच मिनिटांनंतर कॅटरिनाही रिसेप्शनला पोहचली. कॅटच्या एन्ट्रीमुळे काय माहित पण युलियाने लगेच काढता पाय घेत कार्यक्रमातून पळ काढला. कॅटला टाळण्यासाठी तर तिने असे केले नसेल ना? युलियाचे असे तडकाफडकी जाणे उपस्थितांच्याही लक्षात आले. एकेकाळी सलमानच्या प्रेमिका राहिलेल्या या दोघी एकमेकींसमोरही येऊ इच्छित नाही असेच वाटतेय.

आता युलियाने खरोखरंच कॅटला पाहून जाण्याचा निर्णय घेतला की, ती निघालीच होती पण योगायोगाने त्याच वेळी कॅटही आली, हे कळण्यास काही मार्ग नाही. सलमानच्या घरी दोघींचा आजही वावर असतो. गेल्या वर्षी युलियाशी सलमान लग्नबद्ध होणार असल्याची चर्चा होती. मात्र तसे काही होऊ शकले नाही. तिकडे कॅटही आता रणबीरसोबतच्या लाँग रिलेशनशिप ब्रेक-अपमधून सावरत आहे.

ALSO READ: ​नील नितीन मुकेश अन् रूक्मिणीचा ‘वेडिंग अल्बम’

Web Title: NEIL NITIN MUKESH'S WEDDING: Yulia Venter escaped seeing Katrina Kaifa?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.