सर्वांसमोर शाहरुखला 'शट अप' म्हणालेला नील नितिन मुकेश; १६ वर्षांनी खुलासा करत म्हणाला- "तुमच्या कुटुंबाकडे..."
By देवेंद्र जाधव | Updated: March 3, 2025 12:20 IST2025-03-03T12:19:48+5:302025-03-03T12:20:15+5:30
एका पुरस्कार सोहळ्यात नील नितिन मुकेश आणि किंग खान यांच्यात शाब्दिक चकमक घडलेली. अखेर नीलने अनेक वर्षांनी त्या घटनेचा खुलासा केलाय (neil nitin mukesh)

सर्वांसमोर शाहरुखला 'शट अप' म्हणालेला नील नितिन मुकेश; १६ वर्षांनी खुलासा करत म्हणाला- "तुमच्या कुटुंबाकडे..."
नील नितिन मुकेश (neil nitin mukesh) हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता. नीलला आपण 'जॉनी गद्दार', 'न्यू यॉर्क' अशा सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय. नीलचा स्वतःचा एक चाहतावर्ग आहे. नीलविषयी एक प्रकरण आजही चर्चेत आहे. ते म्हणजे एका पुरस्कार सोहळ्यात नील आणि शाहरुख खानमध्ये (shahrukh khan) रंगलेला वाद. शाहरुखने एका अॅवॉर्ड फंक्शनमध्ये नीलची मस्करी केली होती. त्यामुळे नीलला चांगलाच राग येऊन तो शाहरुखला सर्वांसमोर 'शट अप' म्हणाला होता. अखेर इतक्या वर्षांनंतर नीलने त्या वादाचा खुलासा केलाय.
नीलला शाहरुखने केलेली मस्करी जिव्हारी लागली?
नीलने एका मुलाखतीत शाहरुख आणि त्याच्यात झालेल्या शाब्दिक चकमकीवर बोट ठेवलंय. नील म्हणाला की, "मला शाहरुख खूप आवडतो. मी शाहरुखसारख्या माझ्या वरिष्ठ कलाकाराला कधीही शट अप असं बोलणार नाही. पण तो एक शो होता आणि त्यावेळी तिथे अनेक गोष्टी घडत होत्या. आमचं ते संभाषण वेगळं होतं आणि मी त्यानंतर कधीच त्या गोष्टीचा उल्लेख केला नाही.
"जर मी माझे आई-वडील, आजोबा यांच्याविषयी आदर व्यक्त करतोय तर मी सर्वांना ही भावना कशी समजावू? मला माझ्या कुटुंबाविषयी आदर आहे, माझ्या कुटुंबाला ही गोष्ट माहितीये त्यामुळे हीच गोष्ट माझ्यासाठी महत्वाची आहे. जर त्यांना मस्करी करायची होती तर करुदे. तुम्ही नील नितिन मुकेश नसून तुमच्या कुटुंबाकडे कोणताही वारसा नाहीये. त्यामुळेच तुम्ही माझी मस्करी करु शकता. मुकेश यांची १०० वर्ष हा या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी आजोबांना आदरांजली देतोय, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे."
काही वर्षांपूर्वी म्हणजेच २००९ मधील फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात शाहरुख आणि सैफ अली खान अँकरींग करत होते. तेव्हा शाहरुखने नीलची मस्करी केलेली. "नील नितिन मुकेश सर्व फर्स्ट नेम दिसत आहेत. भाऊ आडनाव कुठे आहे. तुला आडनाव का नाही?" हे ऐकताच नील शाहरुखला सर्वांसमोर 'शट अप' म्हणाला होता.