​आज बोहल्यावर चढणार नील नितीन मुकेश!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2017 06:08 AM2017-02-09T06:08:02+5:302017-02-09T11:38:02+5:30

बॉलिवूडचा चार्मिंग हिरो अशी ओळख असलेला अभिनेता नील नितीन मुकेश आज बोहल्यावर चढणार आहे. आज (९ फेबु्रवारी) संध्याकाळी नील ...

Neil Nitin Mukesh gets upset today! | ​आज बोहल्यावर चढणार नील नितीन मुकेश!

​आज बोहल्यावर चढणार नील नितीन मुकेश!

googlenewsNext
लिवूडचा चार्मिंग हिरो अशी ओळख असलेला अभिनेता नील नितीन मुकेश आज बोहल्यावर चढणार आहे. आज (९ फेबु्रवारी) संध्याकाळी नील आणि त्याची मंगेतर रूक्मिणी सहाय दोघेही लग्नाच्या बेडीत अडकतील. उदयपूर येथे हा ग्रॅण्ड लग्न सोहळा होणार आहे.



नील आणि नीलचे कुटुंब सध्या जाम आनंदात आहेत. नील तर अगदी स्वप्नात असल्यागत वावरतो आहे. मला सगळेच काही परिकथेसारखे भासतेय. सगळं काही स्वप्नवतं. जणू काही लहानपणापासून मला याच दिवसाची प्रतीक्षा होती, असे नील म्हणाला.

नील व रूक्मिणीच्या या लग्नसोहळ्यात सुमारे ५०० लोक सामील होणार असल्याचे कळतेय. गत ७ फेबु्रवारीपासून या लग्नाच्या विधी सुरु झाल्यात. मंगळवारी दोघांचा रोका झाला. त्याच रात्री प्री-वेडिंग पार्टी झाली. काल बुधवारी नील आणि रूक्मिणी यांच्या हातावर मेहंदी रंगली.





मेहंदीची थीम खास राजस्थानी मेळा अशी ठेवण्यात आली होती. मेहंदीसाठी नील एका खास डिझाईन केलेल््या रिक्शातून स्टेजवर आला. यावेळी नाच-गाणी यांनी वातावरण भरून गेले. मेहंदीनंतर रात्र सजली ती संगीत सोहळ्याने. ‘आपकी अदाएं महिफिल सजाएं’अशी संगीत सोहळ्याची थीम होती.



नील व रूक्मिणीच्या मेहंदी सोहळ्याला अभिनेते ऋषी कपूर यांनी हजेरी लावली. बुधवारी दुपारी ऋषी कपूर उदयपुरात पोहोचले. 



आज विवाहसोहळ्यानंतर येत्या १७ फेबु्रवारीला नील व रूक्मिणीचे ग्रॅण्ड रिसेप्शन होणार आहे. मुंबईच्या एका पंचतारांकित हॉटेलात हे ग्रॅण्ड रिसेप्शन होणार आहे. बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींना या रिसेप्शनचे निमंत्रण दिले गेले आहे.



नीलचे हे अरेंज मॅरेज आहे. रूक्मिणी ही नीलच्या आई-वडिलांची पसंती आहे. नील हा सुप्रसिद्ध गायक मुकेश यांचा नातू आहे. नीलचे पापा नितीन मुकेश हेही गायक आहे. मात्र नीलने आजोबा वा पापाच्या मार्गावर न जाता वेगळी वाट चोखाळली. त्याने अभिनेता बनण्याचा निर्णय घेतला.  नील अखेरचा ‘वजीर’ या सिनेमात दिसला होता. याशिवाय ‘प्रेम रतन धन पायो’,‘आ देखें जरा’,‘शॉर्टकट रोमियो’,‘प्लेअर्स’,‘जॉनी गद्दार’ यासारख्या चित्रपटात तो अभिनय करून चुकला आहे.

Web Title: Neil Nitin Mukesh gets upset today!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.