कंगना पाठोपाठ 'ही' बॉलिवूड अभिनेत्री लढवणार लोकसभेची निवडणूक? आमदार वडील म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 12:13 PM2024-03-26T12:13:32+5:302024-03-26T12:14:50+5:30

अभिनेत्री कंगना रणौतनंतर आणखी एक अभिनेत्री निवडणुकीच्या रिंगणतात उतरणार असल्याची चर्चा होत आहे.

neha sharma will never contest lok sabha election 2024 from bihar on congress ticket actress father ajit sharma revealed | कंगना पाठोपाठ 'ही' बॉलिवूड अभिनेत्री लढवणार लोकसभेची निवडणूक? आमदार वडील म्हणाले...

कंगना पाठोपाठ 'ही' बॉलीवूड अभिनेत्री लढवणार लोकसभेची निवडणूक? आमदार वडील म्हणाले...

निवडणुकांचे पडघम वाजू लागलेले असतानाच त्याचे वारे आता सिनेसृष्टीतही वाहू लागले आहेत. अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) हिला लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली असून भाजपकडून तिला तिकीट देण्यात आलं आहे. हिमाचल प्रदेशातील मंडी या लोकसभा मतदारसंघातून कंगना लोकसभेची निवडणूक लढवणार आहे. यातच आता आणखी एक अभिनेत्री निवडणुकीच्या रिंगणतात उतरणार असल्याची चर्चा होत आहे. यातच आता तिच्या वडिलांनी याविषयी मोठा खुलासा केला आहे.

अभिनेत्रीचे वडील देखील काँग्रेसचे जेष्ठ नेते आहेत. त्यांनी अनेकदा निवडणूक जिंकत यश मिळवलं आहे. आपल्या मुलीनं आपला वारसा पुढे चालवत यंदा लोकसभा निवडणूक लढवावी असं वाटत होतं. ही अभिनेत्री आहे नेहा शर्मा. तिचे वडील बिहारच्या राजकारणातील मोठं नाव आहे. तिचे वडील काँग्रेस पक्षाचे अजित शर्मा भागलपूरचे आमदार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये राजकीय वातावरणात नेहा शर्माच्या प्रवेशाच्या चर्चा रंगल्या होत्या. पण, असे होणार नाही.

नेहा शर्माच्या राजकीय प्रवेशाच्या चर्चेला तिच्या वडिलांनी पूर्णविराम दिला आहे. नेहा ही निवडणूक लढवणार नसल्याचं काँग्रेसचे आमदार अजित शर्मा यांनी स्पष्ट केलं आहे. ते म्हणाले, 'माझी मुलगी बॉलिवूड स्टार नेहा शर्माने निवडणूक लढवावी अशी पक्षाची इच्छा होती. म्हणून मी स्वतः तिच्याशी बोललो. पण सध्या ती तिच्या कामात खूप व्यग्र आहे. त्यामुळे तिला निवडणूक लढवणं अशक्य आहे', अशी माहिती त्यांनी दिली आहे.
 

Web Title: neha sharma will never contest lok sabha election 2024 from bihar on congress ticket actress father ajit sharma revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.