'इंडियन आयडल'च्या सेटवर नेहा कक्कर झाली जखमी, व्हिडीओ आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2020 19:10 IST2020-12-17T19:09:45+5:302020-12-17T19:10:13+5:30

नेहा कक्कर रोहनप्रीत सिंगसोबत लग्नात अडकल्यानंतर सध्या इंडियन आयडल शोमध्ये परिक्षकाच्या भूमिकेत पहायला मिळते आहे.

Neha Kakkar was injured on the set of 'Indian Idol', video came in front | 'इंडियन आयडल'च्या सेटवर नेहा कक्कर झाली जखमी, व्हिडीओ आला समोर

'इंडियन आयडल'च्या सेटवर नेहा कक्कर झाली जखमी, व्हिडीओ आला समोर

बॉलिवूडमधील लोकप्रिय गायिका नेहा कक्कर रोहनप्रीत सिंगसोबत लग्नात अडकल्यानंतर सध्या इंडियन आयडल शोमध्ये परिक्षकाच्या भूमिकेत पहायला मिळते आहे. नेहा कक्कर सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे आणि सोशल मीडियावर बऱ्याचदा व्हिडीओ आणि फोटोमुळे चर्चेत असते. यावेळी देखील तिने असाच एक गंमतीशीर व्हिडीओ शेअर केला आहे. इंडियन आयडॉलच्या सेटवरील तिचा हा व्हिडीओ पाहून तुम्हाला देखील हसू येईल. 

नेहा कक्करने इंडियन आयडॉलच्या सेटवरील एक ब्लूपर व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिच्यासोबत संगीतकार हिमेश रेशमिया आणि विशाल दादलानी दिसत आहेत.

तिघेही सेटवर स्लो मोशनमध्ये रॅम्पवॉक करत होते. तेवढ्यात हिमेशनने एक उडी मारली अन् तो नेहाच्या अंगावर पडला. या दरम्यान नेहाला त्याचे कोपर लागले. या अनपेक्षित प्रकारामुळे नेहाच्या चेहऱ्यावर उमटलेले हावभाव पाहून स्टेजवर एकच हास्यकल्लोळ झाला. हा आहे माझा सर्वात क्यूट व्हिडीओ असे लिहून नेहाने या व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला खूप पसंती मिळते आहे आणि इतकेच नाही तर या व्हिडीओवर गंमतीशीर रिएक्शन पहायला मिळतो आहे. 


 नेहा कक्कर २४ ऑक्टोबरला रोहनप्रीत सिंगसोबत लग्नबेडीत अडकली. लग्नाला बरेच दिवस उलटलेले असतानाही अद्याप गायिका नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंह यांच्या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर ऐकायला मिळते. तिचे लग्नाचे व्हिडीओ आणि फोटोजही सोशल मीडियावर अजूनही व्हायरल होत आहेत. 

Web Title: Neha Kakkar was injured on the set of 'Indian Idol', video came in front