नेहा कक्करला पडला कोरोनाचा विसर, मास्क न लावताच पोहचली विमानतळावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2021 17:38 IST2021-01-02T17:33:44+5:302021-01-02T17:38:39+5:30

गायिका नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंग यांचा २४ ऑक्टोबरला मोठ्या दिमाखात विवाह संपन्न झाला. त्यांनी दिल्लीतील एका गुरूद्वारामध्ये सात फेरे घेतले होते.

Neha kakkar Trolled For Not Wearing Mask Corona Pandemic | नेहा कक्करला पडला कोरोनाचा विसर, मास्क न लावताच पोहचली विमानतळावर

नेहा कक्करला पडला कोरोनाचा विसर, मास्क न लावताच पोहचली विमानतळावर

नेहा कक्कर तिच्या लग्नानंतर वेगवेगळ्या गोष्टींमुळे चर्चेत आहे. विशेष म्हणजे गाण्याच्या प्रमोशनसाठी तिने चक्क प्रेग्नंट असल्याचा सांगत चाहत्यांची फिरकी घेतली त्यामुळे तिला मोठ्या टीकेचाही सामना करावा लागला. एकेकाळी तिच्या गायकीवर फिदा असणारे तिच्यावर अमाप प्रेम करणारे रसिक मात्र आता नेहा कक्कडवर खूप नाराज आहेत. त्यामुळे तिच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत.

नेहा कक्कर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीची अपडेट ती चाहत्यांसह शेअर करत असते. नुकतेच नव वर्षाचे सेलिब्रेशन करताना तिचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत ती मस्त मजा मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहे. आपल्याच धुंदीत असलेल्या नेहाला मात्र कोरोनाचाही विसर पडला आहे.

त्यामुळेच विना मास्क ती पतीसोबत सेलिब्रेशन करण्यात दंग दिसतेय. एअरपोर्टवरील नेहा कक्करचा व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओत दिसत असल्याप्रमाणे दोघांपैकी एकानेही मास्क लावलेला नाही. मास्क न लावताच बाहेर फिरत असल्यामुळे नेहा कक्कर पुन्हा एकदा नेटक-यांच्या निशाण्यावर आली आहे. कोरोनाचा विसर पडलेल्या नेहाला नेटक-यांनीही चांगलाच संताप व्यक्त केला आहे.   

गायिका नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंग यांचा २४ ऑक्टोबरला मोठ्या दिमाखात विवाह संपन्न झाला. त्यांनी दिल्लीतील एका गुरूद्वारामध्ये सात फेरे घेतले होते. रोहनप्रीत सिंगच्या घरी नवोदित वधू नेहा कक्करचे जंगी स्वागत करण्यात आले होते. त्यानंतर एक व्हिडीओ समोर आला होता ज्यात नेहा आणि रोहनप्रीत ढोलच्या तालावर थिरकताना दिसले होते.


नेहा कक्करने आपल्या मेहनतीच्या जोरावर हे यश मिळवलं आहे. अशात तिचे जगभरात फॅन्स आहेत आणि तिच्या स्ट्रगलचे चाहतेही अनेक आहेत. दरम्यान फोर्ब्स मॅगझीनने आशियातील काही सेलिब्रिटींची यादी जाहीर केली होती. यात सोशल मीडियावर अॅक्टिव आणि इतरांना प्रेरित करणारे स्टार्स आहेत. एशिया पॅसिफिक रीजनबाबत सांगायचं तर नेहा कक्कर फोर्ब्सच्या या यादीत सर्वात आघाडीवर होती.

Web Title: Neha kakkar Trolled For Not Wearing Mask Corona Pandemic